छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील उद्यानाकरिता आरक्षित भूखंडावर JWMarriot, Water stone, Lalit International आदि पंचतारांकित हॉटेल्सची उभारणी झाली. ह्या भूखंडावर हॉटेल्सची उभारणी करताना या हॉटेल्सनी नियमानुसार महानगरपालिकेला एकूण भूखंडाच्या १० टक्के जागा उद्यानाकरिता विकसित करून देणे आवश्यक आहे. तसेच १०% जागा खुली जागा अशा प्रवर्गात राखून ठेवणे आवश्यक आहे. ह्याबाबतीत या हॉटेल्सनी उल्लंघन केल्याचे आढळून आल्याने भाजपा नगरसेवक अभिजित सामंत यांनी सुधार समितीमध्ये जानेवारी २०२० मध्ये हरकतीचा मुद्दा घेतला तसेच तत्कालीन मनपा आयुक्तांना भेटून त्याबाबत पत्र दिले होते.
हे ही वाचा:
आनंद तेलतुंबडेचा भाऊ होता मिलिंद तेलतुंबडे; इंजीनिअरिंगनंतर वळला नक्षलवादाकडे
तुमच्याकडून लाच तर घेतली गेली नाही ना, पंतप्रधानांनी विचारला प्रश्न…काय आहे प्रकरण?
‘महाआघाडी आणि रझा अकादमीच्या नेत्यांना ठाकरे पवार सरकारकडून अटक का नाही?
त्रिपुरात कोणत्याही मशीदिची तोडफोड, नुकसान झालेच नाही
ह्या नंतर मनपाला जाग येऊन के पूर्व विभाग अधिकारी तसेच इमारत प्रस्ताव व इस्टेट विभागाने ह्याबाबत संबंधित भूखंडास भेट दिली तदनुसार JWMarriot ने मनपास १० % जागा उद्याना करिता देण्याचे मान्य केले आहे, परंतु अजून हा भूखंड मनपाच्या ताब्यात देण्यात आला नाही. Waterstone ह्या पंचतारांकित क्लब बाबत मनपाने कोणतीही कार्यवाही सुरू केली नाही. ह्या दिरंगाईमुळे मरोळ येथील नागरिक, विशेष करून लहान मुलं तसेच वरिष्ठ नागरिक उद्यान व मोकळ्या जागेपासून वंचित आहेत.
ह्या बाबत मनपा कडून कार्यवाही व्हावी व एकूण १ लाख स्केअर फूट उद्यान मरोळकराना उपलब्ध व्हावे म्हणून एक स्वाक्षरी अभियान रविवार १४ नोव्हेंबर रोजी सायं ५ वाजता घेण्यात येत आहे. हे स्वाक्षरी अभियान पुढील आठवडाभर ह्या सम्पूर्ण विभागात चालवून सर्व स्वाक्षऱ्या मनपा आयुक्तांना सुपूर्द करण्यात येतील.