‘जय श्री राम’ घोषणेला विरोध करणारे प्राध्यापक निलंबित!

एका विद्यार्थ्याने स्टेजवर दिलेल्या घोषणेला केला होता विरोध

‘जय श्री राम’ घोषणेला विरोध करणारे प्राध्यापक निलंबित!

शनिवारी, २१ ऑक्टोबर रोजी गाझियाबादमधील एबीईएस कॉलेजच्या सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान एका विद्यार्थ्याने स्टेजवर ‘जय श्री रामची’ घोषणा दिली होती.रसायनशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक ममता गौतम आणि सहायक प्राध्यापक श्वेता शर्मा यांनी या घोषणेला विरोध करत त्या विद्यार्थ्याला स्टेज वरून खाली उतरण्यास सांगितले.त्यानंतर एबीईएस कॉलेजने कारवाई करत दोन प्राध्यपकांचे निलंबन केले आहे.प्राध्यपकांवर निलंबनाची कारवाई केल्याची माहिती एबीईएस कॉलेजचे संचालक संजय कुमार सिंग यांनी ट्विटद्वारे दिली.

एबीईएस कॉलेजचे संचालक डॉ संजय कुमार सिंह यांनी ट्विट करत म्हणाले, “काल एक व्हिडिओ माझ्या समोर आला.त्या व्हिडिओच्या आधारे आम्ही उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली. कॉलेज प्रशासनाने या समितीला २४ तासांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.त्यानंतर समितीने दिलेल्या शिफारशीच्या आधारे बेजबाबदार वर्तन केल्याबद्दल दोन प्राध्यापकांना निलंबित करण्यात आले आहे, असे सिंह यांनी ट्विट केले.

निलंबित करण्यात आलेल्या ममता गौतम ह्या रसायनशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक आहेत तर त्याच विभागातील सहायक प्राध्यापक श्वेता शर्मा यांचा यामध्ये सहभाग आहे.ममता गौतम यांना १६ वर्षांचा अध्यापनाचा अनुभव आहे, तर श्वेता शर्मा यांना या क्षेत्रातील १२ वर्षांचा अनुभव आहे.दरम्यान, आदल्या दिवशी एबीईएस कॉलेजची वेबसाइट हॅक करण्यात आली होती आणि हॅकरने प्रोफेसर ममता गौतम यांना सुपनखा (रामायणातील एक दृष्ट पात्र, रावणाची बहीण) म्हणून दाखवण्यात आले व मुख्यपृष्ठावर ‘जय श्री राम’ असे लिहिले होते.मात्र, दुपारनंतर वेबसाईट पुन्हा व्यवस्थित सुरु झाली.

हे ही वाचा:

यश शहा अपहरण- हत्या प्रकरणातील चारही आरोपी सुटले निर्दोष

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर

इस्रायल हल्ल्यादरम्यान हमासचे दहशतवादी अमली पदार्थांच्या नशेत!

राजनैतिक अधिकाऱ्यांवर केलेल्या कारवाईनंतर ट्रुडो पुन्हा बरळले

विशेष म्हणजे वेबसाइट हॅकिंगच्या घटनेपूर्वी निलंबित करण्यात आलेल्या प्राध्यपका ममता गौतम यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता.माझ्यावर टीका करणाऱ्यांना कायदेशीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा त्यांनी आपल्या व्हिडिओ मार्फत दिला होता.तसेच विद्यार्थ्यांच्या चुकीमुळे हे सर्व घडल्याचे सांगितले.मी स्वतः हिंदू आहे त्यामुळे आमचा विरोध नसल्याचे त्यांनी व्हिडिओद्वारे सांगितले.

दरम्यान, जय श्री रामच्या घोषणेला विरोध करत विद्यार्थ्याला स्टेजवरून खाली उतरवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच हिंदू संघटनांनी विरोध सुरू केला.त्यानंतर ममता गौतम आणि श्वेता शर्मा या कॉलेजच्या प्राध्यापकांना आता निलंबित करण्यात आले आहे.

 

 

 

 

 

 

 

Exit mobile version