24 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरविशेषएबी डी व्हिलिअर्सने मागितली विराट कोहली, अनुष्का शर्माची माफी

एबी डी व्हिलिअर्सने मागितली विराट कोहली, अनुष्का शर्माची माफी

त्यांना खासगी जीवन व्यतीत करू देण्याचे चाहत्यांना आवाहन

Google News Follow

Related

दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डी व्हिलिअर्सने विराट कोहली आणि त्याच्या कुटुंबासाठी माफीनामा जाहीर केला आहे. त्याने त्याच्या युट्युब चॅनलवर कोहली आणि अनुष्का यांना दुसरे अपत्य होणार असल्याचे वक्तव्य केले होते. मात्र त्याने ते दुरुस्त केले आणि त्यांचे खासगी आयुष्य त्यांना जपू द्यावे, असे आवाहन त्याने चाहत्यांना केले.

इंग्लंडविरुद्ध महत्त्वाची कसोटी सामन्यांची मालिका सुरू असताना कोहली भारतीय संघात नसल्याबद्दल क्रिकेट रसिक वेगवेगळे तर्क लढवत होते. त्यातच एबी डिव्हिलिअर्सने विराट कोहली आणि पत्नी त्यांच्या दुसऱ्या अपत्याच्या प्रतीक्षेत आहेत, अशी माहिती दिली.

हे ही वाचा:

काँग्रेसमधून हकालपट्टी झालेले प्रमोद कृष्णम म्हणाले, राम आणि राष्ट्र याबाबत तडजोड नाही!

‘भारत जोडो यात्रे’ला वेळेआधीच विराम मिळण्याची चिन्हे

शेतकऱ्यांचे दिल्लीला प्रयाण; हरियाणातून पंजाबला जाणारे रस्ते बंद!

पर्यटनात महाराष्ट्र बनला आता आंतराष्ट्रीय आकर्षणाचा केंद्रबिंदू 

मात्र त्याने १० फेब्रुवारी रोजी त्याच्या युट्युब चॅनलवर याबाबत माफी मागितली आहे. ‘माझा मित्र विराट कोहली अद्यापही क्रिकेट सामने खेळू शकणार नाही. परंतु त्याला हवा तसा खासगीपणा जपू द्यावा, अशी विनंती मी प्रत्येकाला करतो. कुटुंब हे नेहमीच प्रथम येते. नेमके काय चालले आहे, हे कोणालाच माहीत नाही. मी आपल्या सर्वांना त्याचा आदर करण्याची विनंती करतो. माझ्या मागील कार्यक्रमात मी थोडी चूक केली होती आणि त्याबद्दल मी कोहली कुटुंबाची माफी मागतो,’ असे एबी डिव्हिलियर्सने म्हटले आहे.

‘जे झाले, ते योग्य नव्हते. ज्याबाबत खात्री नाही, अशी माहिती मी दिली. त्याचा, त्याच्या कुटुंबीयांचा आणि खासगी वेळेचा आदर करावा, असे आवाहन मी प्रत्येकाला करतो. विराट पुन्हा येईल, आनंदी राहील आणि नेहमीप्रमाणे धावा करेल, अशी आशा आपण व्यक्त करूया,’ अशी पुस्तीही त्याने जोडली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा