31 C
Mumbai
Friday, January 10, 2025
घरविशेषदिल्लीच्या पाणीसंकटाला अन्य राज्ये जबाबदार असल्याचा ‘आप’चा दावा खोटा

दिल्लीच्या पाणीसंकटाला अन्य राज्ये जबाबदार असल्याचा ‘आप’चा दावा खोटा

हरयाणा, उत्तराखंडमधून अधिक पाणी मिळतेय... दिल्ली जल मंडळाचे म्हणणे

Google News Follow

Related

राष्ट्रीय राजधानी तीव्र जलसंकटाशी झुंज देत असताना, नवी दिल्लीतील सत्ताधारी पक्ष ‘आप’ने शेजारच्या भाजपशासित राज्यांनी दिल्लीचा पाणीपुरवठा कमी केल्यामुळे जलसंकट वाढल्याचा आरोप केला आहे. ‘उष्णतेच्या लाटेमुळे पाणीपुरवठ्याची मागणी वाढली आहे. शेजारच्या राज्यांनी दिल्लीला पाणीपुरवठा कमी केला आहे, परिणामी मागणी जास्त आणि पुरवठा कमी आहे,’ असा दावा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

‘जर भाजपने हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील त्यांच्या सरकारांना दिल्लीला महिनाभर पाणीपुरवठा करण्यासाठी राजी केले तर दिल्लीतील लोक त्यांच्या प्रयत्नांचे खूप कौतुक करतील,’ असेही केजरीवाल म्हणाले होते. दिल्लीच्या जलमंत्री आतिशी यांनीही दिल्लीचा पाणीपुरवठा कमी केल्याचा आरोप हरियाणावर केला आहे. दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आप सरकारनेही शेजारच्या राज्यांना, विशेषत: हरियाणाला संकटग्रस्त दिल्लीला अधिक पाणीपुरवठा करण्याचे निर्देश द्यावेत, या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

तथापि, आप सरकारच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या दिल्ली जल मंडळाने जाहीर केलेल्या माहितीनेच आप सरकारचा खोटेपणा उघड केला आहे. जल मंडळाच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, हरियाणा आणि उत्तराखंडमधील स्त्रोतांकडून दिल्लीला निर्धारित केलेल्या पाण्याच्या वाट्यापेक्षा जास्त पाणी मिळत आहे. शिवाय, दिल्ली जल मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हथनीकुंड बॅरेजमधून तलावात येणाऱ्या यमुना प्रवाहातून निर्धारित केलेल्या पाण्यापेक्षा वजिराबादला आधीच सुमारे ८५ दशलक्ष गॅलन प्रतिदिन (एमजीडी) पाणी जास्त मिळत आहे.

विशेष म्हणजे, जल मंडळाने नुकतेच उन्हाळी बुलेटिनचे स्वरूप बदलले आणि शेजारच्या राज्यांमधील स्त्रोतांकडून प्राप्त होणारे संचयी पाणी (दशलक्ष गॅलन प्रतिदिन) आणि दिल्लीतील प्रकल्पातील पाण्याचे उत्पादन याची माहिती देण्यास सुरुवात केली आहे.

डीजेबीने या महिन्यात उन्हाळी बुलेटिन सुरू केले होते आणि २९मेपर्यंत ते सर्व जलशुद्धीकरण केंद्रांवर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा तपशील, विविध ठिकाणी केलेल्या पाण्याच्या गुणवत्तेच्या चाचण्यांचा तपशील आणि तक्रारींचा सारांश प्रकाशित करत होते. तथापि, २१मे पासून, जल मंडळाने विविध स्रोतांकडून प्राप्त झालेल्या पाण्याची माहिती प्रकाशित करण्यास सुरुवात केली.

३१ मे, १ जून आणि २ जून रोजी प्रकाशित झालेल्या तीन उन्हाळी बुलेटिन्समध्ये असे दिसून आले आहे की प्रत्येक दिवशी, निर्धारित प्रमाणाच्या तुलनेत दिल्लीला हरियाणा आणि उत्तराखंडमधून एकूण जास्त पाणी मिळत आहे. दिल्लीला हरियाणाकडून तीन मार्गांनी पाणी मिळते. दिल्ली उपशाखा, कॅरियर लाइन्ड कालवा आणि यमुना नदीद्वारे पाणी मिळते. हरियाणाकडून दिल्लीसाठी एकूण निर्धारित वाटप ५४७ एमजीडी ठरले असताना, ३१ मे रोजी ६०४ एमजीडी आणि १ आणि २ जून रोजी प्रत्येकी ६०७ एमजीडी पाणी मिळाले. दिल्लीला अप्पर गंगा कालव्यातून दररोज २५४ दशलक्ष गॅलन पाणीवाटप अपेक्षित आहे. या तीनही दिवशी दिल्ली जल मंडळाला २५७ एमजीडी म्हणजे 3 एमजीडी अधिक मिळाले. अप्पर गंगा कालवा हा उत्तर भारतातील एक प्रमुख जल कालवा आहे, जो उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये उगम पावतो आणि उत्तर प्रदेशात पाणी वाहून नेतो. तथापि, उत्तर प्रदेशातील मुरादनगरजवळ, पाइपलाइनमुळे काही पाणी दिल्लीकडे वळवले जाते, जे भागीरथी जलशुद्धीकरण केंद्र आणि डीजेबीद्वारे चालवल्या जाणाऱ्या सोनिया विहार जलशुद्धीकरण केंद्राकडे पाठवले जाते.

उल्लेखनीय म्हणजे, दिल्ली जल मंडळाच्या बुलेटिननुसार, दिल्लीला यमुना नदीतून कोणतेही पाणी मिळणे अपेक्षित नसताना त्यांनी ३१ मे रोजी ८५ एमजीडी आणि १ आणि २ जून रोजी प्रत्येकी १०१ एमजीडी नदीतून उचलले. दिल्ली उपशाखाकडून जास्त पाणी मिळाल्याने, हरियाणातून मिळालेले एकूण पाणी एकूण निर्धारित प्रमाणापेक्षा अधिक होते.

ग्रीष्मकालीन बुलेटिनचा संदर्भ देत, दिल्ली जल मंडळाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, सुमारे ८५ एमजीबी पाण्याची उचल डीजीबीद्वारे केली जाते. जे खरे तर निर्धारित केलेले नाही. म्हणजे हे पाणी एकतर दिल्ली अधिकृत मंजुरीशिवाय उचल करत आहे किंवा हरियाणा सरकार आधीच ठरलेल्यापेक्षा जास्त पाणी दिल्लीला देत आहे. आप नेत्यांचे आरोप फेटाळून लावताना, डीजेबीच्या आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्हाला वर्षाच्या या वेळी हरियाणातून जेवढे पाणी मिळते तेवढेच पाणी मिळत आहे, परंतु तापमान अभूतपूर्व पातळीवर पोहोचत असल्याने लोकांच्या समस्या वाढल्या आहेत. आम्ही त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत.

हे ही वाचा:

एग्झिट पोलनंतर आता मतमोजणीवर लक्ष

मालदीवने दाखवली पॅलेस्टाइनप्रति एकजूटता

उद्धव ठाकरेंना पत्रकार परिषद भोवणार, कारवाईचे आदेश

राममंदिराच्या पुजाऱ्याने पंतप्रधान मोदींबाबत सांगितले मोठे भविष्य!

दिल्ली जल मंडळाची ही माहिती हरियाणाने दिल्लीला पाणीपुरवठा कमी केल्याच्या जलमंत्री आतिशी यांच्या आरोपाचे खंडन करतात. यावर प्रकाश टाकत भाजपचे दिल्ली अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी आप सरकारवर टीका केली. ‘दिल्लीमध्ये पाण्याची किंवा शुद्ध पिण्याच्या पाण्याची कमतरता नाही, समस्या ही आहे की केजरीवाल सरकारच्या मंत्री सुश्री आतिशी राजकीय वक्तृत्वात इतक्या व्यग्र आहेत की त्या पाणी आणि वीज संकटाकडे लक्ष देऊ शकत नाहीत,’ असा आरोप त्यांनी केला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा