‘आप’कडून अनैतिक राजकारणाचे उदाहरण’

काँग्रेसनेते संजय निरुपम यांची टीका

‘आप’कडून अनैतिक राजकारणाचे उदाहरण’

काँग्रेस पक्षाने आम आदमी पक्षाशी हातमिळवणी करून त्यांना महाविकास आघाडीत सहभागी करून घेतले असले तरी त्यांच्या सहभागावरून काँग्रेसमधलेच नेते नाराज असल्याचे दिसून येत आहे. मद्यधोरण घोटाळ्याप्रकरणी केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर आता संजय निरूपम यांनी अरविंद केजरीवाल यांनी त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
संजय निरुपम यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून आपले मत दर्शवले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मोठ्या संकटातून जात आहेत, त्यांच्या प्रति सहानुभूती आहे. काँग्रेस पक्षानेही त्यांना सार्वजनिक रूपात पाठिंबा दिला आहे, हे मान्य केले तरी ते भारतीय राजकारणात नैतिकतेचे जे उदाहरण समोर ठेवत आहेत, त्यामुळे आपल्याला हे लिहिणे भाग पडत असल्याचे निरुपम यांनी म्हटले आहे.

‘एक काळ असा होता जेव्हा हवाला व्यावसायिक जैन यांच्या कथित डायरीत लालकृष्ण अडवाणी, माधवराव सिंधिया आणि कमलनाथ यांसारख्या नेत्यांची नावे आली होती आणि त्यांच्यावर लाच घेतल्याचा आरोप होता. तेव्हा त्यांनी नैतिकतेच्या आधारावर लगेचच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. लाल बहाद्दूर शास्त्री यांनी एका रेल्वे अपघातामुळे राजीनामा दिला होता,’ याची आठवण त्यांनी करून दिली.

हे ही वाचा :

पापुआ न्यू गिनीमध्ये शक्तिशाली भूकंप!

आयएसआयएसमध्ये सहभागी होण्यासाठी जाणारा आयआयटी गुवाहाटीचा विद्यार्थी ताब्यात!

कोलकात्याचा हैदराबादवर थरारक विजय!

आरसीबी पराभवानंतरही विराट कोहली सोशील मीडियावर व्हायरल

यूपीए सरकारच्या कार्यकाळातही भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर अनेक मंत्र्यांनी राजीनामे दिले होते. काही महिन्यांपूर्वी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी अटक होण्यापूर्वी पदाचा राजीनामा देऊन नैतिक कृती केली होती. हजारो वर्षे मागे जाऊ तर असे दिसेल की, पित्याच्या वचनासाठी रामाने राज्यावर पाणी सोडले होते. भारताची अशी महान परंपरा राहिली आहे, असे ते म्हणाले.

दिल्लीच्या मद्यघोटाळ्याचे सत्य काय आहे, याचा निर्णय न्यायालय घेईल. मात्र एका मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप लावण्यात आला आहे. त्यांना अटक करण्यात आली आहे. ते कोठडीत आहेत आणि मुख्यमंत्री अजूनही खुर्चीला चिकटून आहेत. ही कुठली नैतिकता आहे?, असा प्रश्न विचारून त्यांनी केजरीवाल यांच्याकडे राजीनाम्याची मागणी केली आहे. भारताच्या राजकारणात अवघा ११ वर्षे जुना असलेला पक्ष राजकारणात पूर्णपणे अनैतिक होण्याचे उदाहरण समोर ठेवतो आहे, केजरीवाल यांच्या खुर्चीला चिकटून राहण्याच्या मोहामुळे भारताचे राजकारण कमकुवत होत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Exit mobile version