आप आमदार गोगींचा डोक्यात गोळी लागल्याने मृत्यू

चुकून गोळी लागली असल्याचा अंदाज

आप आमदार गोगींचा डोक्यात गोळी लागल्याने मृत्यू

आम आदमी पक्षाचे नेते आणि लुधियाना पश्चिमचे आमदार गुरप्रीत बस्सी गोगी यांचा बंदुकीच्या गोळीमुळे मृत्यू झाल्याची घटना घडली. पोलिसांनी याबद्दल सांगितले की त्यांच्याकडे परवाना असलेली बंदूक आहे. त्यातून चुकून गोळी लागली असण्याची शक्यता आहे. पोलिस उपायुक्त जसकरण सिंग तेजा म्हणाले, कुटुंबातील सदस्यांच्या म्हणण्यानुसार त्यानी चुकून स्वतःवर गोळी झाडली गोळी त्यांच्या डोक्याला लागली. गुरप्रीत गोगी यांना रुग्णालयात नेण्यात आले होते तिथेच त्यांना मृत घोषित करण्यात आले. सध्या त्यांचा मृतदेह हा डीएमसी रुग्णालयातील शवागारात ठेवण्यात आला आहे.

तेजा म्हणाले, पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर मृत्यूचे कारण निश्चित केले जाईल. ही घटना मध्यरात्री घडली. त्यांच्या मृत्यूच्या काही तास आधी गोगी यांनी विधानसभा अध्यक्ष कुलतार सिंग संधवान आणि आप खासदार बलबीर सिंग सीचेवाल यांच्याशी ‘बुद्ध नाला’ (प्रदूषित सांडपाण्याचा नाला) साफसफाईच्या मुद्द्यावर बैठक घेतली होती. काही दिवसांपूर्वी चोरी झालेल्या बीआरएस नगर येथील प्राचीन शीतला माता मंदिरालाही त्यांनी भेट दिली होती आणि या प्रकरणी न्यायाचे आश्वासन दिले होते.

हेही वाचा..

सरपंच देशमुख हत्या प्रकरणी सातही आरोपींवर मोक्का!

केरळमध्ये दलित मुलीचे तब्बल ६४ जणांनी केले शोषण

हे होणारच होतं…ठाकरे-काँग्रेस ही खुर्चीसाठीचीचं युती होती!

‘AI ऍक्शन’साठी पंतप्रधान मोदी जाणार फ्रान्सला

याबद्दल बोलतना अरविंद केजरीवाल म्हणाले, त्यांच्या नसण्याने पोकळी निर्माण झाली असून ती भरून निघणे कठीण आहे. एक्सवरील पोस्टमध्ये केजरीवाल म्हणतात, त्यांच्या अकाली निधनाबद्दल जाणून खूप दुःख झाले. गुरप्रीत गोगी बस्सी जी यांनी लोकांची समर्पण आणि करुणेने सेवा केली. या कठीण काळात माझे विचार आणि प्रार्थना त्यांच्या दुःखी कुटुंबासोबत आहेत.

गोगी २०२२ मध्ये आम आदमी पार्टीमध्ये सामील झाले आणि २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत लुधियाना पश्चिम मतदारसंघातून दोन वेळा आमदार भारतभूषण आशु यांचा त्यांनी पराभव केला. त्यांची पत्नी सुखचैन कौर गोगी यांनी गेल्या महिन्यात महापालिकेची निवडणूक लढवली होती. गोगी यांनी गेल्या वर्षी बुद्ध नाला पुनरुज्जीवन प्रकल्पाची पायाभरणी करून संबंधित विभागांनी प्रकल्प राबविण्यास होत असलेल्या दिरंगाईबद्दल नाराजी व्यक्त केली होती.

२०२२ मध्ये आमदार होण्यापूर्वी गोगी यांनी लुधियानामध्ये दोनदा नगरपरिषद म्हणून काम केले. त्यांनी मागील काँग्रेस सरकारच्या काळात पंजाब लघु उद्योग आणि निर्यात महामंडळाचे अध्यक्ष म्हणूनही काम केले. गोगी २०१४ ते २०१९ पर्यंत लुधियाना जिल्हा काँग्रेस (शहरी) अध्यक्ष होते. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी स्कूटरवरून आल्यावर त्यांनी लक्ष वेधून घेतले होते.

Exit mobile version