आम आदमी पार्टीचे आमदार अमानतुल्लाह खान यांच्या घरावर सोमवारी (२ सप्टेंबर) ईडीने छापेमारी करत अटक केली होती. दिल्लीतल्या कथित वक्फ घोटाळा प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी अमानतुल्लाह खान यांची अनेक वेळा चौकशी करण्यात आली होती.
मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान यांना राऊस ॲव्हेन्यू कोर्टात हजर केले होते. कोर्टाने त्यांना ४ दिवसांच्या ईडी कोठडीवर पाठवले आहे. आता ईडी त्यांना ६ सप्टेंबरला पुन्हा कोर्टात हजर करणार आहे.
हे ही वाचा :
गणेशोत्सवाच्या तोंडावर एस टी कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक
राजस्थानमध्ये मिग २९ विमान कोसळलं; पायलट सुखरूप
अंबाबाईच्या दर्शनाला प्रथमच आल्या राष्ट्रपती !
पंतप्रधान मोदी उद्यापासून ब्रुनेई-सिंगापूर दौऱ्यावर !
अमानतुल्लाह खान हे आम आदमी पार्टीचे आमदार असून दिल्लीतल्या ओखला या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. दिल्ली वक्फ बोर्डाच्या संचालक पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाला त्याचा तपास ईडीकडून केला जात आहे. सोमवारी सकाळी ईडीच्या पथकाने अमानतुल्लाह यांच्या घराची झडती घेतली. काही तास या ठिकाणी झडती घेतल्यानंतर ईडीने अमानतुल्लाह यांना अटक केली.