माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर राज्यात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सरू आहे. या घटनेनंतर विरोधक सत्ताधारी नेत्यांवर टीका करत आहेत. याच दरम्यान, आम आदमी पक्षाच्या नेत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. परंतु, आप नेता यावरून ट्रोल झाले आहेत, अनेकांनी तर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
आपचे नेते आणि दिल्लीतील उत्तम नगरचे आमदार नरेश बलियान यांनी बाबा सिद्दिकी यांच्या हत्येबाबत दावा केला की, या घटनेनंतर मुंबईत ‘बदला पुरा’ अशा आशयाचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे बॅनर लागले आहेत. नरेश बलियान यांनी ट्वीटकरत लिहिले की, महाराष्ट्र सरकारचे एक माजी मंत्री, राजकीय नेता आणि एक उद्योगपती यांची हत्या झाली.
यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे फोटो लावून बॅनर लावेल की “बदला पूरा”, याचा अर्थ काय झाला, ही हत्या फडणवीस यांनी घडवून आणली?, एका गृहमंत्र्याचे आणि उपमुख्यमंत्र्याचे असे पोस्टर संपूर्ण शहरात त्यांच्या मर्जी शिवाय लागू शकतात का?, देश कोणत्या दिशेने जात आहे?, देवा रक्षण कर या देशाचे, असे नरेश बलियान यांनी म्हटले.
हे ही वाचा :
बाबा सिद्दिकी यांच्यासोबत झीशान सिद्दिकीही होते टार्गेटवर
नेमबाज स्वप्निल कुसाळेला २ कोटी रुपये तर गोळाफेकपटू सचिन खिलारीला ३ कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द!
खर्गेंकडून जमीन परत करणे म्हणजे भ्रष्टाचाराची कबुली!
दरम्यान, आप नेत्याच्या पोस्टनंतर सोशल मिडीयावर अनेकांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली. हे बॅनर एका जुन्या घटनेवर लावण्यात आले, बाबा सिद्दिकीच्या हत्येशी संबंध नसल्याचे एका नेटकऱ्याने म्हटले. काहींनी तर मुंबई पोलिसांना टॅग करत कारवाई करण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्र सरकार के एक पूर्व मंत्री, राजनेता और एक उद्योगपति की हत्या हो गई। उसके बाद पुरे मुंबई में महाराष्ट्र के गृहमंत्री और उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis की फोटो लगा कर पोस्टर लगा दिया गया "बदला पूरा",
इसका क्या मतलब क्या हुआ की ये हत्या फडणवीस ने करवाई है? एक गृहमंत्री और… pic.twitter.com/r1Idtzw68X
— Naresh Balyan (@AAPNareshBalyan) October 13, 2024