आम आदमी पार्टीचे तुरुंगमंत्री सत्येंद्र जैन यांचा मसाज करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खूप टीका झाली होती. सत्येंद्र जैन यांना जेलमध्ये व्हिआयपी ट्रीटमेंट देऊन ऐशआरामात कसे काय राहू दिले जाते, असे नानाविध प्रश्न उपस्थित केले गेले. आता सत्येंद्र जैन यांचा आणखी एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे.
या व्हिडिओमध्ये दोन व्यक्ती जैन यांच्या खोलीची साफसफाई करताना दिसत आहेत. यादरम्यान जैन तुरुंगातील अधिकाऱ्यांशी बोलतानाही दिसत आहेत. हा व्हिडिओ भाजपाचे नेते हरीश खुराणा यांनी ट्वीट केला आहे. खुराणा यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, लाट साहब १० कर्मचारियों से सेवा ले रहे हैं असेही म्हटले आहे. जैन हे मनी लॉड्रिंग प्रकरणात तिहारच्या तुरुंगात बंद आहेत. ईडी या प्रकरणाची चौकशी करत असून न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केलेला नाही.
हेही वाचा :
‘पोलिस’ निघाले चोर; २२ लाख लुटले
सोमालियाच्या लष्कराचा बॉम्ब हल्ला, १०० दहशतवाद्यांचा खात्मा
पंतप्रधान मोदींना धमकी देणाऱ्याला गुजरातमधून अटक
तिहार तुरुंगाची देखरेख करण्याची जबाबदारी दिल्ली सरकारची आहे. याआधीही जैन यांचे अनेक व्हिडिओ लीक झाले आहेत. एका व्हिडिओमध्ये जैन यांना मसाज केले जात आहे. विशेष म्हणजे जैन ज्याच्याकडून मसाज करून घेत आहेत, तो कैदी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी तुरुंगात आहे. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये कच्च्या भाज्या आणि फळे खाताना जैन दिसत आहेत. फळांच्या व्हिडीओबाबत बोलताना, कारागृहात इतर कैद्यांना नियमावलीनुसार जेवण मिळते. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजप आणि काँग्रेस आपवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. केजरीवाल आपल्या मंत्र्याला तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आता गृह मंत्रालयाने या प्रकरणी दिल्लीच्या लेफ्टनंट गव्हर्नर यांच्याकडून तिहार तुरुंग प्रशासनाचा अहवाल मागवला आहे.
भाजपने एका दिवसापूर्वी जैन यांचा आणखी एक व्हिडिओ जारी केला. ज्यामध्ये तो तुरुंग अधिक्षक अजित कुमार यांच्याशी जैन बोलताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, कारागृह अधीक्षक जैन जेव्हा बॅरेकमध्ये येतात तेव्हा काही लोक तेथून निघून जातात.