23 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरविशेषमद्य घोटाळाप्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक

मद्य घोटाळाप्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक

सीबीआयने ८ तासांच्या चौकशीनंतर केली कारवाई

Google News Follow

Related

आम आदमी पक्षाचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना मद्य घोटाळाप्रकरणी सीबीआयने अटक केली आहे. तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर त्यांना ही अटक करणअयात आळी आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत सिसोदिया यांना अटक केली गेली आहे.

पोलिसांनी यासंदर्भात सांगितले की, दक्षिण दिल्लीत १४४ कलम लागू करण्यात आले आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हे कलम लागू करणअयात आले आहे. कडक बंदोबस्तही सिसोदिय यांच्या निवासस्थानाबाहेर ठेवण्या आला आहे. निमलष्करी दलालाही पाचारण करण्यात आले आहे. यासंदर्भात आंदोलन करत असलेल्या आम आदमी पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यत घेतले आहे.

सिसोदिया यांच्या समर्थनार्थ आंदोलन आणि घोषणाबाजी करणाऱ्या ५० समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यात ४२ पुरुष आणि ८ महिला आहेत.

हे ही वाचा:

क्रूझ ‘एमव्ही गंगा विलास’ चा पहिला प्रवास २८ फेब्रुवारीला संपणार

राहुल गांधी म्हणतात, ५२ वर्षांचा झालो पण आजही मला घर नाही!

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी उभारले होते क्रांतिचे मंदिर; अभिनव भारत मंदिर

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काढली लतादिदींची आठवण, रांगोळी, अंगाई गीत कलेची घेतली दखल

यानिमित्ताने सिसोदिया यांनी ट्विट करत हे म्हटले होते की, आपण सीबीआयच्या चौकशीला पूर्ण सहकार्य करत आहोत. चौकशीला जाण्यापूर्वी ते राजघाटला गेले. त्याआधी त्यांनी आपल्या आईची भेट घेतली. तिथे त्यांनी भावनिक भाषण केले होते. आपल्या पक्षासाठई आणि आपल्यासाठी हा अत्यंत खडतर असा काळ आहे. आपल्या कुटुंबाबद्दल बोलताना ते भावूक झाले होते. आपल्या पत्नीने या कठईण काळात आपल्यालाल साथ दिल्याचेही ते म्हणाले होते.

रविवारी सीबीआयने म्हटले होते की, सिसोदिया यांना विचारणअयासाठी अनेक महत्त्वाचे प्रश्न तयार आहेत. गेल्या वर्षी ऑगस्टमध्येच मद्यघोटाळ्याविरोधात सीबीआयने एफआयआर दाखल केला होता. त्यात सिसोदिया आणि १४ अन्य लोकांचा समावेश होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा