आम आदमी पार्टीने आज अखेर आसाममधील लोकसभेच्या तीन जागांवर उमेदवारांची घोषणा केली. आपकडून गेल्या काही महिन्यांपासून इंडी आघाडीबरोबर चर्चा सुरु होती मात्र यात यश आले नाही. त्यामुळे आपने तीन उमेदवारांची घोषणा केली. दिब्रुगडमधून मनोज धनोहर, गुवाहाटीमधून भावेन चौधरी आणि सोनितपुरमधून ऋषी राज यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती खासदार संदीप पाठक यांनी दिले.
हेही वाचा..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राहुल गांधींनी पुन्हा जात काढली
पाकिस्तानमध्ये निवडणुकीदरम्यान हल्ला, ५ पोलिसांचा मृत्यू!
पंतप्रधान मोदींकडून मनमोहन सिंगांचे कौतुक!
रजिया सुलतानच्या काळात बांधण्यात आलेली ७०० वर्षे जुनी मशीद जमीनदोस्त!
पाठक म्हणाले की, निवडणुकीपूर्वी उमेदवारांना प्रचारासाठी आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी वेळ देणे महत्त्वाचे आहे. या पार्श्वभूमीवर इंडी आघाडीबरोबर अनेक महिन्यांपासून चर्चा सुरु आहे. मात्र केवळ बोलून बोलून आम्ही कंटाळलो आहोत. आम्हाला त्या जागा लढवून जिंकायच्या आहेत. आमच्याकडे वेळ नाही. त्यामुळे उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. आपण इंडी आघाडीसोबत असून जागा वाटपाच्या वाटाघाटीला गती देण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.इंडी आघाडीतील समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या १६ जागांसाठी उमेदवार जाहीर केल्यानंतर आता आप ने सुद्धा आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
इंडी आघाडीमध्ये दिवसेंदिवस जागावाटपाच्या मुद्द्यावरून वाद होत असल्याचे दिसून येत आहे. केवळ भारतीय जनता पक्षाला निवडणुकीत हरवण्यासाठी देशात कॉंग्रेससह इतर विरोधी पक्षांनी आघाडी तयार केली आहे. या आघाडीच्या बैठका झाल्या असल्या तरी अद्याप जागा वाटपाबद्दल काहीही ठरलेले नाही. त्यामुळे देशात विविध राज्यात होत असलेल्या निवडणुकांसाठी प्रादेशिक पक्षांची गोची होत आहे. त्यामुळे इंडी आघाडीमधील सहभागी विविध राजकीय पक्षामध्ये एकला चलो रे ची भावना वाढीला लागल्याचे दिसून येते. त्यातूनच आता जो आम आदमी पक्षाने घेतलेला निर्णय आहे तो झाला आहे असे म्हणावे लागेल.