‘मन की बात’ संवादाचे एक महत्त्वाचे माध्यम

अभिनेता आमिर खानने केले भरभरून कौतुक

 ‘मन की बात’  संवादाचे एक महत्त्वाचे माध्यम

‘मन की बात’ कार्यक्रम हे संवादाचे एक महत्त्वाचे माध्यम असून या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी सामान्य नागरिकांशी संपर्क साधतात. मन की बात कार्यक्रमाचा लोकांच्या मनावर खोलवर परिणाम झाला अशी प्रतिक्रिया बॉलिवूड अभिनेता आमिर खानने व्यक्त केली आहे.पंतप्रधान मोदींचा ‘मन की बात’ कार्यक्रमाचे येत्या ३० एप्रिल रोजी १०० भाग पूर्ण करणार आहे. यानिमित्ताने दिल्लीत ‘मन की बात’ राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. अभिनेता आमिर खान, रवीना टंडन यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनीया परिषदेत सहभाग घेतला.

‘मन की बात’ कार्यक्रमाच्या संदर्भात माध्यमांनी अमीर खानला बोलते करण्याचा प्रयत्न केला. मद्यमांशी बोलताना आमिर खान म्हणाला, “मन की बात”चा भारतातील लोकांवर खोलवर परिणाम झाला आहे.” ‘मन की बात’ हा चर्चेचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. देशातील नेते महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करतात, कल्पना मांडतात आणि सूचना करतात. अशा प्रकारे आपण संवादाद्वारे नेतृत्व करता. भविष्याबद्दल तुमचे काय विचार आहेत हे या माध्यमातून तुम्ही लोकांना सांगता त्यात तुम्हाला त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे हे सांगता. त्यामुळे हे एक संवादाचे एक महत्त्वाचे माध्यम असून ते मन की बात माध्यमातून केले जाते. पंतप्रधानांनी केलेली ही अत्यंत ऐतिहासिक गोष्ट आहे अशा शब्दात आमिरने पंतप्रधानांच्या मन की बात कार्यक्रमाचे भरभरून कौतुक केले.

हे ही वाचा:

पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल कालवश

आयकर खात्याची नाशिकमध्ये धाड; सापडली ३,३३३ कोटींची बेहिशोबी मालमत्ता

रथ जगन्नाथ मंदिराचा! लंडनमध्ये उभारलं जातंय पहिलं मंदिर

आयईएस, बांद्रा ज्युनियर महाविद्यालयाला विजेतेपद

पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त आपल्याच मनाची गोष्ट करतात का ? असे विचारले असता आमिर म्हणाला, मला वाटते की हा त्यांचा विशेषाधिकार आहे, ते असे करतात कारण जनतेचे म्हणणे काय हे जाणून घेण्यासाठी देशभरातील लोकांशी संपर्क साधण्याची ही त्यांची पद्धत आहे. मला वाटते की हा एक अतिशय महत्त्वाचा उपक्रम आहे.

मन की बात परिषदेमध्ये आमिर खान आणि रवीना टंडन, पुद्दुचेरीच्या माजी नायब राज्यपाल किरण बेदी, संगीतकार रिकी केज, वादक निखत जरीन आणि दीपा मलिक, कथाकार नीलेश मिश्रा, उद्योजक संजीव भिकचंदानी आणि टीव्ही मोहनदास पै सहभागी झाले आहेत. या सर्वांचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ च्या विविध भागात केला होता.

Exit mobile version