क्रिकेट पटू स्टीव्ह स्मिथ आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनी बुधवारी (३ एप्रिल) मुंबईत चाहत्यांची भेट घेतली. एवढेच नाहीतर दिग्गज क्रिकेटपटूंनी मुंबईच्या गल्लीमध्ये क्रिकेट खेळून स्थानिक पाककृतींचा आस्वादही घेतला.
स्टार स्पोर्ट्सच्या ‘स्टार नो फार’ उपक्रमांतर्गत ऑस्ट्रेलियाचा फलंदाज आणि इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मुंबईच्या रस्त्यावर उतरले आणि चाहत्यांची भेट घेतली.चाहत्यांना आणि स्टार्सना (खेळाडू) जवळ आण्यासाठी ‘स्टार नो फार’ हा उपक्रम राबवण्यात आला.टाटा आयपीएल २०२४ च्या अधिकृत प्रसारकाने चाहत्यांना आणि स्टार्सना जवळ आणण्यासाठी ‘स्टार नो फार’ या उपक्रमाचे आभार मानले आहे.
हे ही वाचा:
‘द केरळ स्टोरी’ प्रसारणाल विजयन यांचा विरोध
अरुण गवळी उर्फ डॅडीची तुरुंगातून सुटका होणार; मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश
काँग्रेसकडून जाहीरनामा प्रसिद्ध!
केजरीवाल यांचा फोटो पाहून भगतसिंग यांच्या नातूचा संताप!
‘स्टार नो फार’ उपक्रमांतर्गत स्मिथ आणि ब्रॉड यांनी मुंबईतील सान्ताक्रूझ येथे चाहत्यांची भेट घेऊन गल्लीत क्रिकेट खेळले.त्यानंतर दादरच्या शिवाजी पार्क अकादमीला भेट दिली.अँकर तनय तिवारी यांच्यासमवेत या दोघांनी दादर येथील प्रकाश शाकाहारी उपहार केंद्रात मुंबईतील पारंपारिक ‘मिसळ पाव’ चा आस्वाद घेत स्थानिक जेवणाचा आस्वाद घेतला.
स्मिथ आणि ब्रॉड यांचा जेवणाचा आस्वाद घेताना एक फोटो व्हायरल झाला.टेबलावर साबुदाणा वडा, पुरी भाजी, थालीपीठ, मिसळ असे पदार्थ दिसत आहेत.दादर येथील प्रकाश शाकाहारी उपहार केंद्रात मराठमोळे पदार्थ मिळतात आणि अनेक क्षेत्रातील लोक इथे गप्पांचा फड रंगवतात.