निर्भीड पत्रकार रोहित सरदाना यांचे निधन

निर्भीड पत्रकार रोहित सरदाना यांचे निधन

निर्भीड हिंदी पत्रकार आणि ‘आज तक’ या वाहिनीचे वृत्त निवेदक रोहित सरदाना यांचे निधन झाले आहे. सरदाना यांच्यावर कोविडचे उपचार सुरु होते. पण या उपचारादरम्यानच त्यांचे निधन झाले. शुक्रवार, ३० एप्रिल रोजी दुपारी सरदाना यांच्या निधनाचे वृत्त आले.

.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दर दिवशी हजारो लोक या जगाचा निरोप घेत आहेत. यात सर्वसामान्य माणसापासून ते अनेक प्रसिद्ध व्यक्ती असे सारेच आहेत. शुक्रवारी अशाच काही नामवंत व्यक्तींनी या जगाला अलविदा म्हटले. यात माजी ऍटर्नी जनरल सोरी सोराबजी, वरिष्ठ पत्रकार रोहित सरदाना यांचा समावेश आहे सरदाना हे हिंदी पत्रकारितेतील एक प्रसिद्ध पत्रकार होते. आज तक या वृत्त वाहिनीचे ते लोकप्रिय वृत्त निवेदक होते. त्यांची वार्तांकनाची शांत शैली आणि त्यांचा सदैव हसतमुख असणारा चेहरा लोकांना प्रचंड भावायचा. ‘आज तक’ मध्ये रुजू होण्याच्या अगोदर सरदाना हे ‘झी न्यूज’ वाहिनीसाठी कार्यरत होते. तेथे त्यांचा ‘ताल ठोक के’ हा राजकीय चर्चेचा कार्यक्रम भरपूर लोकप्रिय होता. पुढे आज तकसाठीही ते ‘दंगल’ नावाच्या राजकीय चर्चेच्या कार्यक्रमाचे संचालन करायचे.

हे ही वाचा:

माजी अटॉर्नी जनरल सोली सोराबजी यांचे कोरोनामुळे निधन

कोरोनाच्या पार्शवभूमीवर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक

‘या’ शोएबने घेतली अरविंद केजरीवालांची विकेट

मुख्यमंत्र्यांचे आज पुन्हा ‘फेसबुक लाईव्ह’

 

काही दिवसांपूर्वी सरदाना यांना कोविड असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर त्यांच्यावर कोविडसाठीचे आवश्यक उपचार सुरु होते. उपचार सुरु असतानाच शुक्रवारी अचानक त्यांना हृदयविकराचा तीव्र झटका आला आणि त्यांचे निधन झाले. सरदाना यांच्या मृत्यूबाबत देशभर शोक व्यक्त केला जात आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा अशा साऱ्यांनीच सरदाना यांच्या जाण्याबद्दल शोक व्यक्त केला आहे.

Exit mobile version