मुंबईसह राज्यभरात गणपती विसर्जनाचा उत्साह दिसून येत आहे. अशातच मुंबईसह उपनगरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसाच्या आगमनामुळे गणेश भक्तांमध्ये उत्साह दिसून येत आहे. दरम्यान, जुहू समुद्रकिनाऱ्यावर गणपती विसर्जनासाठी तैनात असलेल्या एका तरुणावर वीज पडल्याची दुर्घटना घडली आहे. हा तरुण जखमी झाला असून सध्या त्याला मुंबई महापालिकेच्या विलेपार्ले पश्चिम येथील कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राज्यभरात सर्वत्र गणेश विजर्सन सोहळा सुरू आहे. हजारोंच्या संख्येने भाविक जागोजागी बाप्पाला निरोप द्यायला जमलेले असताना जुहू किनारपट्टीवर ही दुर्घटना घडली आहे. मुंबईमध्ये लाखोंच्या संख्येने भाविक जमा झाले आहेत. अनेक गणपती मंडळांनी समुद्र किनारी जाण्यास सुरुवात केली आहे. गणपतीचे विसर्जन करण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर गणपती मिरवणुकांनी येण्यास सुरुवात केलीये. सुरक्षेच्या कारणास्तव काही तरुणांना जुहू किनाऱ्यावर तैनात करण्यात आले आहे. तो त्याचे काम करत असताना त्याच्यावर वीज कोसळल्याची घटना घडली. सध्या त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटना घडताच त्याला तत्काळ रुग्णवाहिणीतून नेण्यात आले आहे.
हे ही वाचा
रेल्वे कर्मचारी ‘घुसले’ मोबाईलमध्ये, रेल्वे शिरली प्लॅटफॉर्मवर!
‘बारामती ऍग्रो’ प्लांट ७२ तासांत बंद करण्याच्या रोहित पवारांना सूचना
विमानतळांची कामे मार्गी लावण्यासाठी खासगी कंपनीकडील पाच विमानतळांचा ताबा ‘एमआयडीसी’ने घ्यावा
सन २०२४ आणि २०२९मध्ये ‘एक देश, एक निवडणूक’वर उमटू शकते मोहोर!
मुंबईत गणपती विसर्जनाचा उत्साह असतानाच पावसालाही सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली असून भाविकांचा उत्साह दुप्पट पाहायला मिळत आहे. काही भागात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. गणपती विजर्सन असल्याने भरपावसात नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.