वडिलांनी ठरवलेल्या लग्नाला विरोध केल्याने तरुणीची हत्या

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यातील प्रकार

वडिलांनी ठरवलेल्या लग्नाला विरोध केल्याने तरुणीची हत्या

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यात एका २० वर्षीय तरुणीने तिच्या लग्नाला विरोध केल्याने आणि तिच्या पसंतीच्या व्यक्तीशी लग्न करण्याचा आग्रह धरल्याने तिच्या वडिलांनी आणि चुलत भावाने तिची गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेनंतर पीडितेच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली असून चुलत भावाचा शोध सुरू आहे. ही घटना मंगळवार, १४ जानेवारी रोजी ग्वाल्हेरच्या गोले का मंदिर परिसरात या मुद्द्यावर बोलावलेल्या पंचायतीदरम्यान (सामुदायिक बैठक) घडली.

बैठक सुरू असताना महिलेने जारी केलेल्या व्हिडिओची चौकशी करण्यासाठी पोलिसांचे पथक त्या ठिकाणी पोहोचले. व्हिडिओमध्ये तनू गुर्जर या महिलेने आरोप केला आहे की तिचे वडील महेंद्र गुर्जर आणि इतर नातेवाईकांनी तिला घरात कैद करून ठेवले आणि लग्नाला विरोध केल्याने मारहाण केली.

हेही वाचा..

काँग्रेसच्या मुख्यालयाला इंदिरा गांधीचे नाव दिल्याने भाजपचा हल्लाबोल

युद्धनौका, पाणबुडी निंर्मिती हा भारताच्या बळकटीकरणाचा पुरावा

मुंबई बस अपघात : न्यायालयाने चालकाचा जामीन अर्ज फेटाळला

जसप्रीत बुमराह ठरला आयसीसीचा ‘प्लेअर ऑफ द मंथ डिसेंबर २०२४’

मी सहा वर्षांपासून एका पुरुषासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. सुरुवातीला माझ्या कुटुंबाने आमच्या लग्नाला मान्यता दिली, पण नंतर त्यांनी ते नाकारले. त्यांनी मला मारहाण केली आणि मला जीवे मारण्याची धमकीही दिली. मला काही झाले तर किंवा माझ्या मरणाला माझे कुटुंब जबाबदार असेल, असे पीडितेने व्हिडिओ संदेशात म्हटले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या कुटुंबीयांनी १८ फेब्रुवारीला तिचे लग्न निश्चित केले होते आणि पाहुण्यांना निमंत्रण पत्रिका पाठवली होती. तथापि, तनू या विवाहाच्या विरोधात होती आणि १४ जानेवारीच्या बैठकीत तिने पुन्हा लग्नाला विरोध दर्शवला. बैठकीत महेश गुर्जर यांनी पोलिसांना तनुशी एकांतात बोलण्याची परवानगी देण्याची विनंती केली. त्यानंतर त्याने तिला घरातील एका खोलीत नेले आणि देशी बनावटीच्या पिस्तुलाने तिची गोळ्या झाडून हत्या केली. पीडितेचा चुलत भाऊ राहुल गुर्जर यानेही तिच्यावर गोळीबार केला आणि घटनास्थळावरून पळ काढला.

पोलिसांनी महेश गुर्जरला खुनाच्या ठिकाणाहून अटक केली तर राहुलचे लोकेशन ट्रेस करण्यासाठी एक टीम तयार करण्यात आली आहे. या घटनेबाबत बोलताना ग्वाल्हेरचे पोलिस उपअधीक्षक नागेंद्र सिंह सिकरवार म्हणाले, ग्वाल्हेरच्या गोले का मंदिर परिसरातील आदर्श नगर कॉलनीत एका पित्याने आपल्या मुलीची गोळ्या झाडून हत्या केली. महिलेचे लग्न १८ फेब्रुवारीला ठरले होते.

महिलेला तिच्या पसंतीच्या व्यक्तीशी लग्न करायचे होते, तर वडिलांनी तिचे लग्न दुसऱ्या व्यक्तीशी निश्चित केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेला ४ गोळ्या लागल्या, त्यानंतर तिचा जागीच मृत्यू झाला. फॉरेन्सिक टीमने घटनेचे पुरावे गोळा केले आहेत आणि मुख्य आरोपीला भारतीय न्याय संहिताच्या संबंधित कलमांतर्गत अटक करण्यात आली आहे, असे सिकरवार म्हणाले.

Exit mobile version