32 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरविशेषसेल्फीचा मोह आवरेना; साताऱ्याच्या बोरणे घाटात २५० फूट दरीत तरुणी कोसळली पण...

सेल्फीचा मोह आवरेना; साताऱ्याच्या बोरणे घाटात २५० फूट दरीत तरुणी कोसळली पण…

घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Google News Follow

Related

रायगड जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी इन्फ्लुएन्सर अन्वी कामदार हिचा ३०० फूट दरीत कोसळून मृत्यू झाला होता. व्हिडीओ शूट करण्याच्या नादात तिचा जीव गेला होता. दरम्यान, साताऱ्यातही असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सेल्फी घेण्याचा मोह न आवरल्यामुळे ही तरुणी २५० फूट खोल दरीत कोसळली. मात्र, सुदैवाने या तरुणीचा जीव वाचला असून तिला वाचवण्यात यश आले आहे.

सज्जनगड-ठोसेघर परिसरातील बोरणे घाटात ‘मंकी पॉइंट’जवळ एक युवती डोंगराच्या कडेला सेल्फी घेत होती. अचानक तिचा तोल गेल्यामुळे ती २५० फूट खोल दरीत कोसळली. पण, सुदैवाने ती ४० फुटांवरच एका झाडीत अडकली आणि तिचा जीव वाचला. ट्रेकर्सने तिला बाहेर काढत तिचे प्राण वाचवले. ठोसेघर संयुक्त वन व्यवस्थापन समिती आणि सातारा तालुका पोलिसांनी वेगाने बचावकार्य राबवून दरीत पडलेल्या युवतीला वाचवले. त्या युवतीला महाबळेश्वर टेकर्स आणि शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमने सुखरूप बाहेर काढून साताऱ्यातील एका खासगी रुग्णालयात तिला उपचारासाठी दाखल केले आले आहे.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यात दिसत आहे की, रेस्क्यू टीमचे सदस्य तिला वर घेऊन येत आहेत. यावेळी ती युवती जखमी झाली असून, तिला नीट उभे राहणेही जमत नसल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. वेदनेने ही तरुणी व्हीवळत असून वर येतानाच ती दोन वेळा पुन्हा खाली पडताना दिसत आहे.

हे ही वाचा:

महायुती सरकारचा बळीराजाला दिलासा; पिकांच्या नुकसानीपोटी ५९६ कोटींची मदत जाहीर

युपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या अकोल्यातील विद्यार्थिनीची दिल्लीत आत्महत्या

अतिरेकी संघटना हिजबुल्लाचा इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला

हिमाचल प्रदेश, उत्तराखंडात पावसाचा प्रकोप; विविध घटनांमध्ये १६ लोकांचा मृत्यू

सातारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती तथा जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील धबधबे, पर्यटनस्थळे आणि धोकादायक धरण परिसरात जाण्यास पर्यटकांना सक्त मज्जाव केला आहे. मात्र, पर्यटनस्थळांवर युवक-युवती, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि पर्यटक पोलिसांचा डोळा चुकवीत हे सर्व नियम धाब्यावर बसवून जातात. यानंतर अशा घटना घडल्यास ट्रेकर्स आणि रेस्क्यू टीमला त्यांचा जीव धोक्यात घालून बचाकार्य करावे लागत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा