पुणे ड्रग्स प्रकरणी एका तरुणाला मुंबईमधून अटक करण्यात आली आहे. हॉटेलच्या बाथरूममध्ये दोन तरुण ड्रग्सचे सेवन करत असल्याचा व्हिडिओ नुकताच समोर आला होता. त्यातीलच एका तरुणाला मुंबईमधून ताब्यात घेण्यात आले आहे.
पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. माहितीच्या आधारे पुणे पोलिसांचे एक पथक मुंबईला पोहचले होते. व्हिडिओमधील ड्रग्सचे सेवन करणाऱ्या तरुणाची ओळख पटवून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या तरुणाकडून मोठी माहिती मिळण्याची शक्यता आहे. हॉटेलमध्ये ड्रग्सचा वापर होतो का?, पार्टीचे आयोजन कशाप्रकारे करण्यात आले होते, पार्टीमध्ये तरुण-तरुणींनी ड्रग्सचे सेवन केले होते का? अशा विविध गोष्टींचा उलगडा आता होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अटक करण्यात आलेल्या तरुणाकडून ड्रग्स प्रकरणी अधिक माहिती शक्यता आहे.
हे ही वाचा:
दक्षिण दिल्लीत गायीचे शव सापडल्यानंतर धमक्या, द्वेषयुक्त भाषणे
कर्नाटकमध्ये चिकन कबाब, माशांच्या पदार्थांत कृत्रिम रंग वापरण्यास बंदी!
‘बंगाल सरकारने खोटे वृत्त पसरवले’
यूपीएससीद्वारे आयोजित परिक्षांवर ‘एआय’ आधारित सीसीटीव्ही यंत्रणेची असणार नजर
दरम्यान, या प्रकरणी आतापर्यंत हॉटेल मालकासह १४ जणांना अटक करण्यात आली आहे. हॉटेल देखील पुणे पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सील करण्यात आले आहे. हॉटेल मधील सीसीटीव्हीच्या आधारे अनेकांचा शोध पुणे पोलीस करत आहेत.