उत्तराखंडमधील मसुरीमध्ये चहामध्ये थुंकल्याचे एक घृणास्पद प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. लायब्ररी चौकात ही घटना घडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. येथील एका पर्यटकाने या घटनेचा व्हिडिओ बनवला होता. व्हिडिओमध्ये एक तरुण चहावर थुंकताना दिसत आहे. पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या दोघेही फरार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण काही दिवसांपूर्वीचे आहे. डेहराडूनच्या नेहरू व्हिलेजमध्ये राहणारे हिमांशू बिश्नोई २९ सप्टेंबर २०२४ रोजी मसुरीला भेट देण्यासाठी आले होते. हिमांशूने दिलेल्या तक्रारीनुसार, मसुरीतील लायब्ररी चौकात उभा असताना दोन तरुण चहा, मॅगी, बन बटर विकताना दिसले. त्याच्याकडून चहा घेतला आणि परिसरात दाट धुके पसरले असल्याने मोबाईल काढून शूट करण्याचे ठरवले. यावेळी त्याच चहाच्या स्टॉलवरील एक तरुण चहाच्या भांड्यात थुंकत असताना दिसला आणि ते मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाले.
हे ही वाचा :
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा रेल्वे उलटवण्याचा कट, रुळावर ठेवल्या ‘सिमेंट स्लीपर’
संजय राऊतांनी काँग्रेसला काढले चिमटे, हरियाणातील पराभवावर टीका
महाराष्ट्रात हरियाणाची पुनरावृत्ती होणार ही काळया दगडावरची रेघ
काँग्रेस, पवार, ठाकरेंनी शस्त्रे परजली होती, पण आता सगळे चिडीचूप!
या प्रकरणी चहा विक्रेत्यांना विचारले असता, त्यांनी शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली, नौशाद अली आणि हसन अली अशी यांची नावे असल्याचे समोर आले. यानंतर पोलीस ठाणे गाठत पुरावा सादर केला. त्यानंतर मसुरी कोतवाली पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी पुढे सांगितले की, आरोपी दोघे भाऊ असून ते अद्याप फरार आहेत. आरोपींचा शोध सुरु आहे. दरम्यान, या प्रकरणावरून संताप व्यक्त केला जात आहे.