26 C
Mumbai
Monday, January 6, 2025
घरविशेषरील बनवताना विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू

रील बनवताना विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू

ठाकुर्ली येथील धक्कदायक घटना

Google News Follow

Related

ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीजवळ असलेल्या ठाकुर्ली येथील एका तरुणाला रील बनवणं जीवावर बेतलं आहे. ठाकुर्ली पंप हाऊस येथे रील बनवत असताना एक तरुण विहिरीत पडला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अग्निशमन दलाच्या मदतीने त्याचा शोध घेतला. दरम्यान, तरुणाचा मृत्यू झाला असून तब्बल ३२ तासांच्या अथक प्रयत्नानंतर या तरुणाचा मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश आलं. बिलाल सोहिल शेख असे तरुणाचे नाव आहे.

ठाकुर्ली येथील पंप हाऊसमधील खोल विहिरीत पडून बिलाल या १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बिलाल दोन मित्रांसह शनिवारी सायंकाळी ठाकुर्ली येथील पंपहाउस येथे रील बनवण्यासाठी गेला होता. रील काढताना बिलाल तोल जाऊन विहिरीत पडला. दरम्यान, त्याच्या दोन मित्रांनी ही माहिती विष्णूनगर पोलिसांनी दिली. माहिती मिळताच पोलीस आणि फायर ब्रिगेडच्या जवानांनी तरुणांचा शोध सुरू केला. पोलीस ठाण्याचे अधिकारी रामचंद्र महाला, विनय कोयंदे, राजेश कासवे, केदार मराठे, महिला कर्मचारी या पथकांनी सदर ठिकाणी शोध कार्य सुरु केले होते.

हे ही वाचा:

सात महत्त्वाच्या शहरांमध्ये पुराचा धोका कमी करण्यासाठी अडीच हजार कोटींचे प्रकल्प उभारणार

ट्यूशन क्लासला दांडी मारून समुद्रकिनाऱ्यावर गेले अन् समुद्रात ओढले गेले

‘उद्धव ठाकरेंच्या १९ बंगल्यांनंतर आता कागदपत्रे गायब’

सलग तीन महिने किरकोळ महागाई दर नीचांकी

या विहिरीत प्रचंड गाळ असल्याने शोधकार्यात अडचणी येत होत्या. तसेच विहीर खोल असल्यामुळे वेळही लागत होता. अखेर ३२ तासांच्या प्रयत्नानंतर बिलालचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. दरम्यान, बिलाल मुंब्रा येथे राहत असताना केवळ रील काढण्यासाठी म्हणून तो ठाकुर्लीला आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा