चंद्रावर पडणार एका महिलेचे पाऊल

या मोहिमेला 'आर्टिमिस ' असे नाव देण्यात आले आहे.

चंद्रावर पडणार एका महिलेचे पाऊल

नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन (नासा) अवकाश संशोधनासाठी नवीन योजना घेऊन परतले आहे. लवकरच ते २०२४ मध्ये यान घेऊन चंद्रावर जाण्याचा विचार करत आहेत. आणि अजून तर मोठी बातमी येणे बाकी आहे! २०२५ मध्ये पहिली महिला अंतराळवीर चंद्रावर पाऊल ठेवणार आहे.

एटीआयटी मुंबईच्या ‘टेकफेस्ट २०२२’ मध्ये नासाच्या सह-प्रशासक कॅथरीन लुएडर्स यांनी ही माहिती दिली. नासाने या वर्षी चंद्रावर नवीन अंतराळ मोहिमेची तयारी सुरू केली आहे. या मोहिमेला ‘आर्टिमिस १’ असे नाव देण्यात आले आहे. या मोहिमेत अंतराळवीरांशिवाय यानाची चाचणी घेण्यात येणार आहे. ‘स्पेसएक्स’ कंपनीचे हे अंतराळयान चंद्रावर उतरणार आहे.

मिशन ‘आर्टेमिस २’ २०२४ मध्ये प्रक्षेपित केले जाईल. या मोहिमेत अंतराळवीरांसोबत यानाची चाचणी घेण्यात येणार आहे. या मोहिमेत अंतराळवीर यानासक्त चंद्राच्या कक्षेतही फिरतील. परंतु अंतराळवीर २०२५ मध्ये चक्क चंद्रावर उतरतील. अंतराळवीर ५-६ दिवस चंद्राच्या पृष्ठभागावर राहतील. पुढील संशोधनासाठी चंद्राचे नमुने पृथ्वीवर आणले जातील. “या मोहिमेत दोन अंतराळवीर असतील ज्यात एक महिला असेल,” कॅथरीन लुएडर्स म्हणाली. त्यानंतरच्या टप्प्यात नासा चंद्राची ३० दिवसांची मोहीम राबवणार आहे. या ३० दिवसांपैकी अंतराळवीर जवळपास दोन आठवडे चंद्रावर वास्तव्य करणार आहेत. या दरम्यान नासा विविध संशोधन करेल’, असेही त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल

‘अरुणाचलच्या तवांगमध्ये धर्मांतरणाविरोधात लढणारा सैनिक म्हणजे तेची गुबीन’

ठाकरेंचा घँडीवाद

नीरज चोप्राचा आणखी एक विक्रम

नासा मंगळ मोहिमेवर लक्ष केंद्रित करत असून त्याची तयारी सुरू असल्याचेही कॅथरीनने नमूद केले. मानवांना सहा महिने तेथे राहण्यासाठी पाठवणे आणि संशोधन करणे हा मुख्य या मोहिमेचा हेतू आहे. या मोहिमेत मंगळाच्या प्रवासाला (जाऊन येऊन) ९ महिने लागतील, कॅथरीन लुएडर्स यांनी सांगितले.

Exit mobile version