साडेतीन मिनिटानंतर ती ‘पास्ता’वली आणि तिने केली कंपनीची तक्रार

फ्लोरिडा येथील एका महिलेने पास्ता उत्पादन करण्याऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल केला.

साडेतीन मिनिटानंतर ती ‘पास्ता’वली आणि तिने केली कंपनीची तक्रार
फ्लोरिडा येथील एका महिलेने पास्ता उत्पादन करण्याऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल केला. खोट्या जाहिराती पसरवून पास्ताची विक्री केल्याचा आरोप या महिलेने कंपनीविरुद्ध दिले आहे.
ह्या महिलेचं नाव अमांडा रमीरेज असे आहे आणि ती फ्लोरिडाची रहिवासी आहे .तिने सुपरमार्केटहून एक चीज मॅकरोनीचं पॅकेट विकत घेतलं. घरी जाऊन तिने ती मॅकरोनी शिजवली. पॅकेटवरचा माहितीनुसार ही चीज मॅकरोनी साडेतीन मिनिटात बनून तयार होते. तिने साडेतीन मिनिटं वाट पाहिली पण तो पास्ता शिजतच नव्हता. तिने ह्या कंपनीवर तब्बल ५० लाख डॉलर म्हणजे ४० कोटी रुपयाचा गुन्हा दाखल केला आहे.

हे ही वाचा :

श्रद्धाला आफताबपासून व्हायचे होते वेगळे

नवले पुलावर अपघात सत्र सुरूचं, सात जखमी

अदानी करणार आशियातील सर्वात मोठ्या धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास

सूरतमध्ये केजरीवालांच्या प्रचार रॅलीमध्ये दगडफेक

हा पास्ता झटपट साडेतीन मिनिटात तयार होईल असे आश्वासन त्या पॅकेटवर लिहिले होते. दिलेली आश्वासने  पूर्ण ने केल्यामुळे त्या महिलेने आपली नाराजी व्यक्त केली . हा पास्ता बनवताना त्या महिलेला खूप प्रक्रिया पाड पडायला लागल्या आणि वेळीच तो पास्ता शिजला  नाही.  ‘कंपनीने फसवी जाहिरात केली असून मॅक्राेनी बनविण्यासाठी अनेक प्रक्रिया पार पाडाव्या लागतात. ह्या मॅकरोनीला शिजवायला  दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ लागतो’ असे तिने तक्रारीत जाहीर  केलं  आहे. “आम्ही हे प्रकरण न्यायालयात नेऊ आणि अमांडाच्या सर्व अडचणी सोडवू.आम्हाला आशा आहे की न्यायालय योग्य निर्णय देईल”, असे कंपनीने म्हटले आहे.
Exit mobile version