पंतप्रधान मोदींच्या गाडीसमोर महिलेने घेतली उडी

पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक

पंतप्रधान मोदींच्या गाडीसमोर महिलेने घेतली उडी

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेमध्ये एक चूक घडल्याची घटना घडली. बुधवार, १५ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेत पुन्हा एक मोठी चूक झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गाडीसमोर अचानक एका महिलेने उडी घेतली. चालकाने प्रसंगावधान साधून करकचून ब्रेक मारलं, त्यामुळे पुढचा अनर्थ टळला. मात्र, या अचानक घडलेल्या कृतीमुळे मोठी खळबळ उडाली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी रांचीच्या दौऱ्यावर होते. यावेळी एका महिलेने अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गाडीसमोर येण्याचा प्रयत्न केला. चालकाच्या प्रसंगवधानाने मोठी दुर्घटना टळली असली तरी काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. सदर महिलेला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा पंतप्रधानांच्या सुरक्षेमधील कमतरता दिसून आली आहे.

हे ही वाचा:

संजय राऊत यांनी ज्यूं विरोधात हिटलरच्या नरसंहाराचे केले समर्थन!

ऐन दिवाळीत कॅनडात खलिस्तानी आणि हिंदूंमध्ये संघर्ष!

पंतप्रधान मोदींविषयी केलेल्या चुकीच्या वक्तव्यामुळे केजरीवाल, प्रियांका गांधींना नोटीस

५.२ रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या धक्क्याने पाकिस्तान हादरले

रांचीमधील कोतवाली ठाणा आणि लालपूर ठाण्याच्या हद्दीतील हे प्रकरण आहे. महिलेला काहीतरी कौटुंबिक अडचण असून ती पंतप्रधानांना भेटण्यासाठी इच्छूक होती, असं सांगितलं जात आहे. सदरील महिला पंतप्रधान येण्याची वाट बघत होती. त्यांची गाडी दिसताच तिने गाडीसमोर उडी घेतली. पंतप्रधानांच्या ताफ्यातील सुरक्षा यंत्रणेमध्ये अशा पद्धतीने कुचराई झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यापूर्वीदेखील दोनवेळा पंतप्रधानांच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.

Exit mobile version