आरे येथे बेस्ट बस आणि दुचाकीच्या अपघातात स्कूटरवर बसलेल्या ४७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. बस चालकाने अपघातासाठी दुचाकीस्वाराला जबाबदार धरले. ह्या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली आहे. तर दुचाकीवरील व्यक्तीने घटनास्थळावरून पळ काढला.
बेस्टच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बस गोरेगाव बस स्थानक पूर्व येथून प्रवाशांना घेऊन जात होती. बुधवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास हा अपघात झाला. तेव्हा ही बस आरेमधील छोटा काश्मीर भागाजवळ आली होती. ह्या अपघातात स्कॉउटरच्या मागच्या सीटवर बसलेली महिलेचा मृत्यू झाला. ह्या बाबतीत त्वरित तक्रार नोंदवण्यात आली आणि बस चालकाने त्या दुचाकी स्वरावर सर्व दोष थोपले. परंतु तोच दुचाकीस्वार अजून फरार आहे.
हे ही वाचा:
परवानगीशिवाय अमिताभ बच्चन यांचा फोटो आणि आवाज वापरता येणार नाही!
श्रद्धा वालकर प्रकरणातील लव्ह जिहाद अंँगलबद्दल काय बोलल्या स्मृति इराणी
आठ तासांची फिल्डिंग आणि चोर आले ताब्यात
विक्रम गोखले यांच्या प्रकृतीला आराम पडतोय!
“ड्रायव्हरने सांगितले की एका दुचाकीस्वाराने आधी स्कूटरला धडक दिली. नंतर वेग वाढवण्याआधी त्या दुचाकीस्वारानी बसच्या मागील डाव्या बाजूला धडक दिली. मोठा आवाज ऐकून बस ड्रायव्हरने गाडी थांबवली आणि सगळं नीट आहे हे सुनिश्चित करायला खाली उतरला. उतरल्यानंतर त्याला स्कॉउटरच्या मागच्या सीटवर बसलेली महिला जखमी झालेली दिसली .त्या महिलेला डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे दिसले पण तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला.” , बेस्ट कंट्रोल रूमने दिलेल्या विधानात म्हणाले.