पुणे, नाशिक, मुंबईसह मुंबईच्या उपनगरांमध्ये पावसाने बुधवारी दमदार हजेरी लावली. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. सखल भागात पाणी साचून रस्ते वाहतूक मंदावली होती तर रेल्वे वाहतूकही उशिराने सुरू होती. बुधवारी सायंकाळी शहरातील अनेक भागांत २०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. अशातच पावसामुळे एका महिलेला आपला जीव गमवावा लागला. अंधेरी भागात एका महिलेचा नाल्यात पडून मृत्यू झाला आहे.
अंधेरीच्या एमआयडीसी भागात एका ४५ वर्षीय महिलेचा उघड्या नाल्यात पडून मृत्यू झाला. या भागात पाणी साचलं होतं. त्यामुळे नाला आणि रस्ता दिसत नव्हता. शिवाय नाल्यावर झाकणही नव्हतं. त्यामुळे ही महिला नाल्यात पडली आणि काही अंतरावर वाहून गेली. अखेर नाल्यात बुडून त्या महिलेचा मृत्यू झाला.
मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी येथील एमआयडीसी भागात विमल गायकवाड या ४५ वर्षीय उघड्या नाल्यात पडल्या. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली होती. या महिलेला नाल्यातून बाहेर काढलं आणि कूपर रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. दरम्यान, नाल्यावर झाकण का नव्हतं? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
Maharashtra | A 45-year-old lady Vimal Gaikwad drowned in an open drain in the MIDC area of Andheri. She was rescued by the Mumbai fire brigade and sent to Cooper Hospital but was declared brought dead by doctors: BMC
— ANI (@ANI) September 25, 2024
हे ही वाचा:
उमराह व्हिसाच्या नावाखाली भिकाऱ्यांना पाठवणे थांबवा, सौदी अरेबियाचा पाकिस्तानला इशारा!
जम्मू-काश्मीरचा दुसरा टप्पा पूर्ण, सरासरी ५४ टक्के मतदान!
भारताच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला १० वर्ष पूर्ण!
उर्दूचा आग्रह करणाऱ्या कर्नाटक सरकारवर भाजपचा प्रहार
मुंबईत बुधवारी सकाळपासूनचं पावसाने हजेरी लावली होती. मात्र, संध्याकाळच्या सुमारास पावसाने रौद्र रूप धारण करत वादळी वाऱ्यासह कोसळण्यास सुरुवात केली. यामुळे कार्यालयातून घराकडे निघणाऱ्यांची दाणादाण उडाली. संध्याकाळच्या मुसळधार पावसामुळे शहरातील सखल भागांत पाणी साचलं. यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. विद्याविहार आणि कांजूरमार्ग दरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकल सेवेवर याचा परिणाम झाला.