‘नजीकच्या भविष्यात इस्रोची अध्यक्ष महिला होईल’

इस्रोचे अध्यक्ष सोमनाथ यांचे भाकीत

‘नजीकच्या भविष्यात इस्रोची अध्यक्ष महिला होईल’

‘भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोची अध्यक्ष नजीकच्या भविष्यात महिला होऊ शकते,’ असे भाकीत इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी वर्तवले आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त चांद्रयान ३ मोहिमेत महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या इस्रोच्या आठ महिला शास्त्रज्ञांचा सत्कार करण्यासाठी एसआयईएस आणि षण्मुखानंद ललित कला आणि संगीत सभा यांच्या संयुक्त विद्यमाने षण्मुखानंद सभागृहात रविवारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली.

यावेळी भारताची पहिली सूर्यमोहीम आदित्य-एल १ या मोहिमेचे प्रकल्प संचालक निगार शाजी यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. तसेचच, चांद्रयान -३चे प्रकल्प संचालक पी. वीरामुथुवेलही या कार्यक्रमाचे सन्मानमूर्ती होते.
या कार्यक्रमात चांद्रयान-३च्या उपप्रकल्प संचालक कल्पना कलाहस्ती, इस्रोच्या टेलिमेट्री, ट्रॅकिंग आणि कमांड नेटवर्कच्या उपसंचालक नंदिनी हरिनाथ, अहमदाबादच्या स्पेस ऍप्लिकेशन सेंटरच्या माधवी ठाकरे, विक्रम साराभाई सेंटरच्या ऍव्हिओनिक्सच्या उपसंचालक अथुला देवी, प्रोपल्शन अँड इलेक्ट्रॉनिक्सच्या समूह संचालक रेवथी हरिकृष्णन, इस्रोच्या इंटिरिअल सिस्टीम युनिटेकच्या समूह संचालक उषा के, लेबोरेटरी फॉर इलेक्ट्रो ऑप्टिक्स सिस्टीमच्या असोसिएट डायरेक्टर कल्पना अरविंद या महिला सन्मानमूर्ती होत्या.

हे ही वाचा..

ऑस्ट्रेलियात भारतीय महिलेची हत्या, कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळला मृतदेह!

आचारसंहितेपूर्वी मंत्रालयात लगबग; पाच दिवसांत ७३० शासन निर्णय जारी

कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत; रस्त्याला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव

‘आयुष्मान’ योजनेचा ४८ टक्के महिलांकडून लाभ!

सोमनाथ यांनी महिलाशक्ती आणि त्यांची अंतराळ संशोधन संस्थेतील महत्त्वाची भूमिका याकडे लक्ष वेधले. ‘इस्रोमध्ये, महिलांची प्रतिभा ओळखण्याचा मार्ग म्हणजे त्यांना अधिक काम देणे. इस्रोमध्ये महिलांना भूमिका देण्याबाबत पंतप्रधान मोदीही उत्सुक आहेत. सध्या महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण जवळपास २० टक्के आहे जे वाढत आहे. आणखी अनेक महिलांना नेतृत्वाची पदे मिळतील. इस्रोमध्ये महिलाशक्ती ही तांत्रिक शक्ती चालवत आहे,’ असे ते म्हणाले. इस्रोमधील कार्यसंस्कृतीमुळे महिलांना त्यांचे करिअर विकसित करण्यास मदत झाली, असेही ते म्हणाले. ज्या मुलींना विज्ञान आणि तंत्रज्ञानात करीअर करायचे आहे, त्या तरुण मुलींसाठी व्यासपीठावरील आठ महिला शास्त्रज्ञ आदर्श आहेत, असेही सोमनाथ म्हणाले.

एक मोहीम, दोन रॉकेट
भारताची इस्रो संस्था चंद्रयान-४ मोहिमेसाठी चंद्राचे खडक आणि माती पृथ्वीवर परत आणण्यासाठी दोन रॉकेट प्रक्षेपित करण्याची योजना आखत आहे. वैज्ञानिक अभ्यासासाठी चंद्राच्या पृष्ठभागावरून नमुने गोळा करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.

आदित्य-एल१ प्रक्षेपणाच्या दिवशी कर्करोग झाल्याचे निदान झाले: चांद्रयान-३ मोहिमेचे नेतृत्व करणारे आणि भारताच्या पहिल्या सौर मोहिमेचे नेतृत्व करणारे इस्रोचे प्रमुख सोमनाथ यांना आदित्य-एल वन प्रक्षेपणादरम्यानच कर्करोगाचे निदान झाले होते. मात्र ते चमत्कारिकरीत्या त्यातून बरे झाले आणि आता ते गगनयान आणि शुक्र मोहिमेसारख्या महत्त्वाच्या अंतराळ मोहिमांवर लक्ष देत आहेत.

Exit mobile version