रामदेवबाबांचा मेणाचा पुतळा न्यूयॉर्कच्या म्युझियममध्ये बसणार

रामदेवबाबांचा मेणाचा पुतळा न्यूयॉर्कच्या म्युझियममध्ये बसणार

योगगुरु बाबा रामदेव यांनी आपल्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण केले. आता हा पुतळा न्यूयॉर्कच्या म्यूजियममध्ये लावण्यात येणार आहे. मंगळवारी एका कार्यक्रमात दिल्लीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचा व्हीडीओ आता समोर आला असून बाबा रामदेव हे आपल्या पुतळ्यासोबत तसेच आचार्य बालकृष्ण उपस्थित असल्याचे दिसून आले. हा पुतळा योगामधील वृक्षासन योगमुद्रेतील आहे. त्या पुतळ्याशेजारी बाबा रामदेव यांनी हे आसनही केले.

हेही वाचा..

राम मंदिर प्राणप्रतिष्ठेला आलेल्या इमामांविरोधात निघाला फतवा!

चंदीगढमध्ये ‘इंडी’गढ ढेपाळला, महापौरपद भाजपाकडे

मालदिवचे मुईझ्झु सरकार कोसळणार?

भारतात मुलाला मारल्यानंतर लंडनमध्ये मौजमजा

बाबा रामदेव यांचा हा पुतळा बनवण्यासाठी २०० शिल्पकारांनी वेगवेगळ्या पद्धतीने मापे घेतली होती. आपल्या या पुतळ्याच्या अनावरणा नंतर बाबा रामदेव म्हणाले, पुतळ्यामध्ये आपल्याला वयाच्या ८ व्या वर्षी जी जखम झाली होती त्या जखमेचे घावसुद्धा या पुतळ्यामध्ये दिसून येतात. एका संन्यासाला जगातील सर्वात मोठ्या म्यूजीयममध्ये सहभागी करून घेतले जात आहे, यावरूनच येणारे शतक हे भारताचे आहे, याचेच हे संकेत आहेत. यावेळी पतंजली योगपीठचे सहसंस्थापक आचार्य बालकृष्ण आणि पतंजली योगपीठ (यूके) ट्रस्टचे संस्थापक सुनिता पोतदार उपस्थित होते.

Exit mobile version