मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या हिवाळी अधिवेशानासाठी म्हणून नागपुरात आहेत. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर येथील मुख्यालयाला भेट दिली. शिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केलं.
रेशीमबाग येथील हेडगेवार स्मृतीस्थळाच्या दर्शनाने ऊर्जा आणि प्रेरणा मिळते, अशा भावना यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांसह शिवसेना आमदार भरत गोगावले आणि अन्य नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.
“हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये असताना रेशीमबागमध्ये भेट देऊन हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेत असतो. इथला परिसर चांगला आहे शिवाय इथे शांती मिळते. इथे येण्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यात काही राजकरण आहे असे तुम्हाला वाटते का? आमचं हिंदुत्व विकासाचं आहे. सबको साथ लेकर चलना असं पंतप्रधानदेखील सांगतात,” अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना दिली.
“आमचं सरकार हे सामान्य माणसाचं सरकार आहे, सामान्य माणूस कधीही मुख्यमंत्र्यांना भेटू शकतो. मी सामान्य माणूस म्हणून काम करतो म्हणून लोक मला प्रेम देतात,” असंही एकनाथ शिंदे म्हणाले. लोकांच्या सेवेची प्रेरणा घेऊन येथून जाणार आहोत, आम्हाला काय मिळाले यापेक्षा आम्ही देशाला काय देणार हा विचार हेडगेवार यांनी दिला आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.
हे ही वाचा:
यवतमाळमध्ये जावयाने पत्नी, सासरा आणि दोन मेहुण्यांना संपवलं
राहुल गांधींचा पत्ता कट, ममता म्हणतात खरगे पंतप्रधानपदाचा चेहरा!
नोटांवर एका माणसाचाच फोटो का? सावरकर,टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे फोटो कधी येणार?
तामिळनाडूत पुरामुळे हाहाःकार; रेल्वे स्थानकावर ८०० प्रवासी अडकले
देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना सुरू केलेल्या योजना मविआ सरकारने बंद केल्या होत्या. त्या आम्ही पुन्हा सुरू केल्या आहेत. राज्यात सगळे जातीपातीचे लोक एकत्र राहतात. त्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडू नये ही आमची भूमिका आहे. जनतेच्या भावना लक्षात घेऊन आम्ही निर्णय घेऊ,” असं मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना सांगितलं.