दूरदर्शी नेते, संस्कृतीचे रक्षक, सुशासनाचे मूर्त रूप असलेले छत्रपती शिवराय अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी

छत्रपती शिवरायांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले अभिवादन

दूरदर्शी नेते, संस्कृतीचे रक्षक, सुशासनाचे मूर्त रूप असलेले छत्रपती शिवराय अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी

छत्रपती शिवाजी महाराज यांची सोमवार, १९ फेब्रुवारी रोजी जयंती असून याचा उत्साह राज्यासह देशभरात दिसून येत आहे. राज्यात सर्वत्र शिवजयंती अतिशय उत्साहाने साजरी केली जात आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं आहे. राजकीय नेत्यांनीही महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. यामध्ये “छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. दूरदर्शी नेते, निर्भीड योद्धे, संस्कृतीचे रक्षक आणि सुशासनाचे मूर्त रूप, त्यांचे जीवन अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे.” असं मोदींनी म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी एक खास व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

हे ही वाचा:

“शिवरायांच्या रणनीतीला रक्ताचा वास नसून मानवतेचा सुगंध”

माजी मंत्री रजनी सातव यांचे निधन

भारताचा इंग्लंडविरुद्ध ऐतिहासिक विजय

काका पुतण्याचे संबंध कसे असावेत? रितेश देशमुखांनी सांगितली आठवण

या व्हिडीओमध्ये महाराजांचे अनेक फोटो असून शिवाजी महाराजांसंबंधित कार्यक्रमांचे व्हिडीओ दिसत आहेत. नरेंद्र मोदी यांनी या व्हिडीओला आवाज दिला असून महाराजांच्या शौर्याचे आणि पराकार्माचे वर्णन त्यांनी केले आहे. “आजपासून ३५० वर्षांपूर्वी ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला तेव्हा त्यात स्वराज्य आणि राष्ट्रीयता या मुल्यांचा जयजयकार होता. शिवाजी महाराजांनी नेहमी भारताची एकता आणि अखंडता याला सर्वप्रथम मानले. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या व्हिजनमध्येही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे प्रतिबिंब दिसून येत आहे. गुलामगिरीने जखडून ठेवलेल्या लोकांमध्ये महाराजांनी आत्मविश्वास निर्माण केला. त्यांनी आपल्या भूमीवर आक्रमण केलेल्यांविरुद्ध लढा दिला. लोकांना त्यांनी राष्ट्रनिर्माणासाठी प्रेरित केलं.” असं या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

Exit mobile version