29 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरविशेषमुंबईच्या कमबॅकचा बंगलोर कडून ॲक्शन रिप्ले

मुंबईच्या कमबॅकचा बंगलोर कडून ॲक्शन रिप्ले

Google News Follow

Related

बुधवार, १४ एप्रिल रोजी रंगलेल्या राॅयल चॅलेंजर्स बँगलोर विरूद्ध सनराईजर्स हैदराबाद या आयपीलच्या सहाव्या सामन्यात बंगलोर संघाने विजय मिळवला आहे. एक वेळ पूर्णपणे हैदराबादच्या खिशात असाणारा सामना बंगलोरने त्यांच्याकडून हिरावून घेतला आहे. मंगळवारी मुंबई इंडियन्सने ज्या प्रकारे कमबॅक करत विजय मिळवला तसेच काहीसे या सामन्यातही पहायला मिळाले.

टाॅस जिंकून हैदराबादने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय बरोबर ठरला आणि बंगलोर संघाला २० षटकांत १४९ धावांवर रोखण्यात त्यांना यश आले. बंगलोर संघाकडून ग्लेन मॅक्सवेलने ४१ चेंडून ५९ धावांची अर्धशतकीय खेळी केली तर कर्णधार विराट कोहलीने ३३ धावांचे योगदान दिले. या व्यतिरिक्त बंगलोरच्या फलंदाजीने निराशा केली.

ही वाचा:

कडक निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकाचा पोलीस मारहाणीत मृत्यू

रेमडेसिवीरबाबत नागपूर खंडपीठाचा महत्त्वाचा निर्णय

ठाणे महापालिकेच्या कोविड हॉस्पिटलमधूनच ‘रेमडेसिवीर’ काळ्या बाजारात?

‘रेमडेसिवीर’ काळा बाजाराचा मालवणी पॅटर्न

१५० धावांचे सोपे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या हैदराबाद संघाची पहिली विकेट लवकर गेली. पण त्यानंतर कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि मनीष पांडे यांनी संघाचा डाव सावरला. त्या दोघांनीही ८३ धावांची भागिदारी रचली. वॉर्नरने ३७ चेंडूत ५४ धावा करत अर्धशतक ठोकले तर पांडेने ३८ धावा केल्या. या दोघांनी रचलेल्या पायावर विजयी कळस चढवायला हैदराबादचे बाकीचे फलंदाज अपयशी ठरले. २० षटकांत हैदरेबादचा संघ १४३ धावाच करू शकला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा