आतापर्यंत, प्रयागराज महाकुंभात ६४ कोटी भाविकांनी संगमात पवित्र स्नान करून एक ऐतिहासिक विक्रम रचला आहे. एकीकडे इतक्या मोठ्या संख्येने भाविक येत असताना, दुसरीकडे महाकुंभात अनेक प्रकारचे रंगही पाहायला मिळत आहेत. देवरिया येथील साहिल राजभर यांनीही असेच काहीसे केल्याने सर्वत्र चर्चा होत आहे. महाकुंभात येणाऱ्या सर्व महिलांना साहिल मोफत चहाचे वाटप करत आहे. साहिलचे म्हणणे आहे कि तो महाकुंभातील महिलांमध्ये आपल्या आईला पाहतो. त्यामुळे महिलांना मोफत चहाचे वाटप करत असल्याचे साहिलने सांगितले.
महाकुंभात, साहिल राजभर दररोज त्याच्या घरून चहाची एक मोठी किटली आणतो आणि येथे येणाऱ्या भाविकांना चहा देण्याचे काम करतो. तो महिलांना अगदी मोफत आणि पुरुषांना दहा रुपयांत चहा देतो. साहिलने सांगितले की त्याला आई नाही. म्हणूनच त्याला प्रत्येक स्त्रीमध्ये त्याची आई आणि बहीण दिसते.
साहिल म्हणाला, महाकुंभ मेळ्यात चहा विक्रीसाठी मला कोणी सांगितले नाही, माझ्या मनात विचार आला आणि बाहेर पडलो. वडील शिलाईचे काम करतात आणि माझे १२ वीचे शिक्षण सुरु आहे, त्यामुळे चहा विक्री मधून मिळणाऱ्या पैशातून शिक्षणाचा थोडाफार खर्चही बाहेर पडेल असा विचार करून चहा विकण्यास सुरुवात केली.
हे ही वाचा :
पवार साहेब तुम्ही तरी स्वाभिमानाच्या बाता करू नका
पहिला ‘छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत’ पुरस्कार ‘अनादी मी अनंत मी’ गीताला
महाकुंभ समारोपाला महाशिवरात्रीचा योग!
काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा!
महाकुंभ मेळ्यात चहा विक्री करताना माहिलांमध्ये माझ्या आईचे रूप दिसून आले आणि मी त्यांना मोफत चहा देण्याचा निर्धार केला. पुरुषांकडून १० रुपये घेतो, पण कोणाकडे पैसे नसतील तर त्यांनाही मोफत चहा देतो. सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या पोलीस जवानांना देखील मोफत चहा देत असल्याचे साहिलने सांगितले.
साहिलच्या आईचे फेब्रुवारी २०२४ मध्ये निधन झाले आणि तो या महाकुंभात आलेल्या सर्व महिलांना आपली आई मानतो आणि त्यांना मोफत चहा देतो. साहिलही छान गातोही. त्याने त्याच्या आईच्या आठवणीत लिहिलेले गाणे गाऊन दाखवले, ते आता खूप व्हायरल होत आहे. दरम्यान, महाकुंभाचा उद्याचा शेवटचा दिवस असणार आहे. आतापर्यंत ६४ कोटींहून अधिक भाविकांनी संगमात स्नान केले असून उद्या महाशिवरात्रीनिमित्त १ कोटीहून अधिक भाविक उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मां की याद में कुंभ में महिलाओं को फ्री में चाय
ऐसी सोच के लिए तालियां बनती हे ..👏👏
इस भाई को तो सैल्यूट बनता हे बॉस 🫡 pic.twitter.com/J4S0MTz1JX
— Amrendra Bahubali 🇮🇳 (@TheBahubali_IND) February 25, 2025