रतन टाटांचा एक अनोखा पैलू, ‘मोठी स्वप्ने पाहणे आणि इतरांना काहीतरी देण्याची आवड’

पंतप्रधान मोदींकडून श्रद्धांजली

रतन टाटांचा एक अनोखा पैलू, ‘मोठी स्वप्ने पाहणे आणि इतरांना काहीतरी देण्याची आवड’

ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी रात्री उशिरा मुंबईतील रुग्णालयात निधन झाले. रतन टाटा यांच्या निधनावर उद्योग, राजकारण आणि चित्रपट जगतातील दिग्गजांनी शोक व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रतन टाटा यांच्या निधनावर शोक व्यक्त करत त्यांना एक दूरदर्शी व्यापारी नेते आणि एक असाधारण माणूस म्हणून संबोधले आहे.

पंतप्रधान मोदींनी ट्वीटकरत म्हटले,  ‘रतन टाटाजींचा सर्वात अनोखा पैलू म्हणजे मोठी स्वप्ने पाहणे आणि इतरांना काहीतरी देण्याची त्यांना आवड होती.  शिक्षण, आरोग्यसेवा, स्वच्छता, प्राणी कल्याण या विषयांचा प्रचार करण्यात ते आघाडीवर होते. रतन टाटा यांनी भारतातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित व्यवसाय घराण्यांपैकी एक, टाटा समूहाला स्थिर नेतृत्व प्रदान केले. नम्रता, दयाळूपणा आणि आपल्या समाजात सुधारणा करण्यासाठी अटल वचनबद्धतेमुळे ते अनेकांचे प्रिय होते.

रतन टाटा यांच्याशी झालेल्या संवादांनी मन भरून आल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले. मुख्यमंत्री असताना गुजरातमध्ये आमची वारंवार भेट होत असे, अनेक गोष्टींवर चर्चा व्हायची. दिल्लीमध्ये आल्यानंतरही संवाद आमचा सुरूच राहिला. त्यांच्या निधनाने खूप दुःख होत आहे, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले.

हे ही वाचा :

‘दुर्मिळ रत्न हरपले’

‘रतन टाटा….एक युग संपले’

‘रतन टाटा यांना आयुष्यभर देशाचाच विचार’

रतन टाटांच्या निधनानंतर उद्योग क्षेत्रात शोककळा; भारतासाठी दुःखद दिवस असल्याच्या भावना

 

Exit mobile version