ह्रदयाच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेत एका ५० वर्षीय माणसाला न्यू इरा रुग्णालयाने जीवनदान दिले. त्याच्या हृदयातील प्राणघातक दोषांमुळे, डॉक्टरांनी त्वरित शस्त्रक्रिया केली ज्यामुळे त्याचे प्राण वाचले.
हा माणूस वेंट्रिक्युलर सेप्टल फुटण्याच्या दुर्मिळ त्रासाने ग्रस्त होता. हा त्रास त्याला नुकत्याच आलेल्या हृदयविकाराचा झटक्यामुळे झाला होता. “वेंट्रिक्युलर सेप्टल फुटणे तेव्हा होते जेव्हा हृदयाच्या दोन वेंट्रिकल्समधील भिंतीला छिद्र होते. या छिद्रामुळे रक्त हृदयात सगळीकडे मिसळते आणि फुफ्फुसात जाते. फुफ्फुसे रक्ताने भरले की, माणसाचा मृत्यू होतो. हा त्रास झाल्याने किमान ८०-९० टक्के रुग्ण हे मृत्युमुखी पडतात”, हे ऑपरेशन करणारे डॉक्टर नेधीश मिश्रा म्हणाले.
न्यू इरा रुग्णालयातील डॉक्टर म्हणाले, ” हा रुग्ण आमच्याकडे एका स्थानिक रुग्णालयातून पाठवला गेला होता. जेव्हा त्याला आम्ही ऍडमिट केले तेव्हा त्याची मृत्यूची शक्यता १६-२० टक्के होती. आम्ही ह्या केसला एक आव्हान समझून घेतले. ह्या परिस्थितीत आमच्या कडे दोनच पर्याय होते. पहिला म्हणजे उच्च जोखीम ओपन हार्ट सर्जरी करणे आणि दुसरा म्हणजे त्याच्या हृदयात छत्रीसारखा यात्री लावणे जे रक्ताचे मिश्रण थांबवू शकते. आम्ही ह्या रुग्णासाठी दुसरा पर्याय निवडला. शस्त्रक्रिया यशस्वी ठरली आणि काही तासांमध्ये त्यांच्यात सकारात्मक चिन्हे दिसायला लागली”.डॉक्टर आनंद संचेती, वरिष्ठ कार्डिओथोरॅसिक सर्जन म्हणाले.
हे ही वाचा :
सूरतमध्ये केजरीवालांच्या प्रचार रॅलीमध्ये दगडफेक
नाशिक आश्रमातील मुलींवरील अत्याचारप्रकरणी चित्रा वाघ यांनी घेतली कठोर भूमिका
शिवडीचा किल्ला अतिक्रमणातून मुक्त करणार
राहुल गांधींविरोधात रणजीत सावरकर यांचा नोंदविला जबाब
न्यू इरामधील डॉक्टरांच्या टीमचे नेतृत्व डॉ मनीष चौखंडे, डॉ निधीश मिश्रा, डॉ आनंद संचेती, डॉ संदिप धूत, डॉ आयुष्मा जेजानी आणि इतर कॅथ लॅब कर्मचारी यांनी केले. रूग्णालयाचे संचालक डॉ. नीलेश अग्रवाल म्हणाले, ” नागपुरात आता सर्व प्रगत हृदय उपचार सुविधा आहेत. आमच्याकडे कुशल डॉक्टर्स आणि तसेच प्रगत तंत्रज्ञान आहे. शहर आता अशा गंभीर प्रकरणांना चांगल्या प्रकारे हाताळण्यास सक्षम आहे.”