पुण्यात शिकाऊ विमान शेतात कोसळलं, पायलट जखमी

पुण्यात शिकाऊ विमान शेतात कोसळलं, पायलट जखमी

पुण्यातील इंदापूर तालुक्यात एक शिकाऊ विमान कोसळल्याची घटना घडली आहे. हे शिकाऊ विमान शेतात कोसळलं आहे. या अपघातात पायलट महिला किरकोळ जखमी झाली आहे. पायलट महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात कडबनवाडी इथे आज, २५ जुलै रोजी सकाळी साडे अकरा दरम्यान ही घटना घडली आहे. तांत्रिक बिघाडामुळे कारवार एव्हिएशन बारामती यांचे शिकाऊ विमान कडबनवाडी गावाच्या हद्दीत कोसळले. यामध्ये शिकाऊ महिला उमेदवार भाविका राठोड (२२) ही किरकोळ जखमी झाली आहे. महिला पायलट राठोड हिला त्वरित नवजीवन हॉस्पिटल शेळगावमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेमध्ये कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही. घटनास्थळी कारवार एव्हिएशनचे कर्मचारी हजर असून योग्य बंदोबस्त घटना ठिकाणी ठेवला आहे.

हे ही वाचा:

“आदिवासी मुलगी देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदापर्यंत पोहचते हे लोकशाहीचे सामर्थ्य”

मै द्रौपदी मुर्मू….. देशाच्या १५ व्या राष्ट्रपतींनी घेतली शपथ!

ऑगस्ट महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद!

मविआ सरकारच्या काळात अघोषित आणीबाणी होती!

बारामती येथील हे शिकाऊ विमान घेऊन महिला पायलट राठोड सराव करत होती. पण तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे विमान इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी गावात एका शेतात कोसळले. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे. विमान पाहण्यासाठी गावकऱ्यांनी एकच गर्दी केली आहे.

Exit mobile version