… आणि केरळमध्ये पार पडला ‘श्वान’दार लग्नसोहळा

… आणि केरळमध्ये पार पडला ‘श्वान’दार लग्नसोहळा

केरळमधील पुन्नयुरक्कूलम या गावात एक अनोखे लग्न पार पडले. सर्व विधिवत आणि यथासांग असा हा लग्न सोहळा पार पडला.

या लग्नाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘कुट्टन’ नाव असलेल्या कुत्र्याचा आणि ‘जानवी’ नाव असलेल्या कुत्रीचा हा लग्नसोहळा होता. सजावट केलेल्या एका लग्नाच्या हॉलमध्ये सर्व विधी करून त्यांचे लग्न पार पडले.

कुट्टन आणि जानवी हे बीगल जातीचे कुत्रे असून कुट्टन हा पोय्यरा शेली निशा या जोडप्यांचा आहे. जानवी ही कुत्र्यांच्या प्रशिक्षण केंद्रात मार्गदर्शक असणारे भास्कर यांच्या मालकीची आहे. एक वर्षांपासून सुरू असलेल्या कुट्टनच्या साथीदाराचा शोध अखेर संपल्याचे शैली यांनी सांगितले. त्यांच्यात बरेच साम्य आहेत त्यामुळे ते दोघेही एकत्र क्लब मधील स्पर्धा जिंकू शकतील. कुट्टनला तीन महिन्यांसाठी प्रशिक्षण केंद्रात ठेवण्यात आले होते, अशी माहिती शेली यांनी दिली.

हे ही वाचा:

बापरे!! बारावी शिकलेला डॉक्टर आणि कंपाऊंडर करत होते उपचार

अफगाणिस्तानमधून आलेले ९ हजार कोटींचे हेरॉइन गुजरातमध्ये घेतले ताब्यात

चक्क कुत्र्यासाठी विमानात बुक केला बिझनेस क्लास

संजय राऊतांनी ढापले ५५ लाख रुपये

इतरांनी ही प्राण्यांवर प्रेम करावे आणि हा संदेश पोहचवण्यासाठीच असा अनोखा लग्न सोहळा आयोजित केल्याचे शेली यांनी सांगितले. हा सोहळा नीट पार पडावा म्हणून त्यांनी सोहळा आयोजन करण्यासाठी एका कंपनीला सांगितले होते. तसेच हे खास क्षण कैद करण्यासाठी फोटोग्राफरलाही बोलावण्यात आले होते, अशी माहिती शेली यांनी दिली.

शेली आणि निशा या जोडप्याने नव विवाहित जोडप्यासाठी खास वेगळ्या खोलीची सोय करून ठेवली आहे. तसेच जेवणात जोडप्याच्या आवडीची बिर्याणी आणि चिकन फ्रायची व्यवस्था त्यांनी केली होती. कुट्टनने या सोहळ्यात सिल्कचा शर्ट परिधान केला होता, तर जानवीने सिल्कचा झगा परिधान केला होता. या दोघांनी एकमेकांना हार घालून हा सोहळा इतर काही जातीच्या कुत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला.

Exit mobile version