एखाद्या रेल्वे स्थानकातील स्क्रीनवर एक अश्लील क्लीप सुमारे ३ मिनिटे चालली हे सांगितले तर तुम्हाला पटणार नाही. पण हे घडले आहे. रविवारी सकाळी दहाची वेळ. पाटणा जंक्शन रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्मवर खचाखच भरलेले. तेवढ्यात स्थानकच्या एलईडी स्क्रीनवर जाहिरतींऐवजी एक अश्लील व्हिडिओ प्ले होतो. स्थानकावर गाड्यांची वाट पाहणाऱ्या शेकडो प्रवाशांना विचित्र परिस्थितीला सामोरे जावे लागले. सगळ्या प्रवाशांना शरमेने माना खाली घालाव्या लागल्या. या घटनेमुळे रेल्वेचे अधिकारी अडचणीत सापडले आहेत. हा व्हिडिओ अनेक प्रवाशांनी आपल्या मोबाइलच्या कॅमेऱ्यात कैदही केला. रेल्वे सुरक्षा दलाने तातडीने हे फुटेज ब्लॉकही केले, परंतु सोशल मीडियाच्या दुनियेत दृश्य व्हायरल झाले आणि हे फुटेज बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार तसेच रेल्वे मंत्रालयाला टॅगही केले गेले.
लोकांना माहिती घेण्यासाठी काऊंटरवर रांगा लावाव्या लागू नयेत, यासाठी रेल्वेकडून प्लॅटफॉर्मवर एलईडी बसवण्यात आले आहेत. काही वेळा एलईडीवर जाहिराती दाखवल्या जातात. रविवार मात्र एक वेगळी जाहिरात या एलईडी स्क्रीनवर झळकली. एक तीन मीनिटांचा घाणेरडा व्हिडिओ प्ले झाला होता. अनेकांनी माना झुकवल्या, तर काही जणांनी त्या व्हीडिओचा व्हीडिओ बनवून शेअरही केला.
हेही वाचा :
आमदार अतुल भातखळकरांचा घणाघात… मराठी शाळांचे वाजताहेत तीन तेरा !
ठाण्यात बांधणार बागेश्वर धामचे मोठे मंदिर
शासकीय, निमशासकीय कर्मचारी उद्यापासून कामावर राहणार हजर; संप मागे
कुठे गायब झालाय खलिस्तानी समर्थक अमृतपाल?
करार रद्द, जाहिरात एजन्सी काळ्या यादीत
मिळालेल्या माहितीनुसार, या लाजिरवाण्या घटनेनंतर जाहिरात आणि माहिती स्क्रीनवर दाखवण्याची जबाबदारी असलेल्या दत्ता कम्युनिकेशन्स एजन्सीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. व्हिडिओ चालवणाऱ्या जाहिरात एजन्सीला दंड ठोठावला असून या एजन्सीला रेल्वेने काळ्या यादीत टाकले आहे. ही पाटण्यातील एलईडी स्क्रीनवर असा घाणेरडा व्हिडिओ प्रसारित होण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. याआधीही पाटण्यात अशा घटना घडलेल्या आहेत.