जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये लष्कराच्या संयुक्त पथकाने एका सशस्त्र दहशतवाद्याचा खात्मा केला. यासह लष्कराने मोठा कट उधळून लावला. लष्कराने चकमकीच्या ठिकाणाहून शस्त्रांचा मोठा साठा आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.
लष्कराच्या चिनार कॉर्प्सने रविवारी (२० ऑक्टोबर) सांगितले की, ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्याकडून एके-४७ रायफल, दोन एके मॅगझिन, ५७ एके राउंड, दोन पिस्तुल, ३ पिस्तुल मॅगझिन आणि इतर अनेक धोकादायक शस्त्रे होती. या आधी चिनार कॉर्प्सने सांगितले, घुसखोरीविरोधात या भागात संयुक्त कारवाई करण्यात आली. घुसखोरीचबाबत गुप्त माहितीच्या आधारे, भारतीय लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी एलओसीजवळ असलेल्या उरी आणि बारामुल्लामध्ये ही कारवाई करण्यात आली.
हे ही वाचा :
हिजबुल्लाची पळापळ, डेप्युटी सेक्रेटरी कासेम लेबेनॉनमधून सटकला
दिल्ली स्फोट: टेलिग्रामकडून ‘जस्टिस लीग इंडिया’ वाहिनीची मागवली माहिती
गांदरबलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डॉक्टरसह सहा स्थलांतरित कामगारांचा मृत्यू
‘पंतप्रधान मोदींसारखा चांगला नेता मिळणे हा देवाचा आशीर्वाद’
संशयास्पद हालचाली लक्षात आल्यानंतर शोधमोहीम राबविली असता समोरून गोळीबार सुरु झाला. प्रत्युत्तरात जवानांनीही गोळीबार केला. दरम्यान, या कारवाईत एक दहशतवादी ठार झाला. लष्करी सैन्य आणि जम्मू काश्मीर पोलिस परिसरात गस्त घालत आहे, शोधमोहीम सुरु आहे.
Update OP ROCK, #Baramulla
The joint team neutralised one heavily armed terrorist and recovered 01xAK Rifle, 02xAK Magazines, 57xAK Rounds, 02xPistols, 03xPistol Magazines and other war-like stores from the site.
Search of the area is underway and Operation is in progress.… pic.twitter.com/rd3rtybKRJ
— Chinar Corps🍁 – Indian Army (@ChinarcorpsIA) October 20, 2024