मलकापूरमध्ये दोन ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; सात प्रवाशांचा मृत्यू

महामार्ग क्रमांक ६ वर पहाटे तीन वाजता अपघात

मलकापूरमध्ये दोन ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; सात प्रवाशांचा मृत्यू

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरामधील महामार्ग क्रमांक सहावर दोन बसचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्दैवी अपघातात सात प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर २५ ते ३० प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही घटना शनिवार, २९ जुलै रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली.

एम एच ०८ ९४५८ ही बस अमरनाथची तिर्थयात्रा करुन हिंगोलीच्या दिशेने जात होती. या ट्रॅव्हल्स बसमध्ये ३५ ते ४० तिर्थयात्री होते. तर एम एच २७ बी एक्स ४४६६ या ट्रॅव्हल्समध्ये २५ ते ३० प्रवाशी होते. ही ट्रॅव्हल्स नागपूरवरुन नाशिकच्या दिशेने जात असताना मलकापूर शहरातून जाणाऱ्या महामार्ग क्रमांक सहावर समोरासमोर धडकून भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोन्ही ट्रॅव्हल्स समोरासमोर भिडल्याने अक्षरशा चिरडल्या गेल्या. या भीषण अपघातत सात प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन्ही ट्रॅव्हल्समधील २५ ते ३० प्रवासी जखमी झाले आहेत.

एका ट्रॅव्हल्समध्ये हिंगोली जिल्ह्यातील यात्रेकरु होते. हे सर्व यात्रेकरु अमरनाथ यात्रा आटोपून हिंगोलिकडे जात होते. यात्रेकरुंची रॉयल ट्रॅव्हल्सची बस हिंगोलीकडे जाताना विरुद्ध दिशेने अमरावतीहून नाशिककडे जाणाऱ्या खासगी प्रवासी बसने जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाला. सर्व मृत हे हिंगोली जिल्ह्यातील असून मृतकांमध्ये तीन महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे.

हे ही वाचा:

बंगालच्या उपसागरात अडकलेल्या ३६ मच्छिमारांची भारतीय नौदलाकडून सुटका

खांद्यात लागलेली गोळी घेऊन ६०० किमी प्रवास, गुन्हा दाखल होऊ नये म्हणून धावपळ

पुरोगामी कुबेरगिरी कोरड्या ओकाऱ्या

पुण्यात गेल्या ७ महिन्यात ६५ सराईत गुन्हेगार हद्दपार

या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस निरीक्षक अशोक रत्नापारखी, दसरखेड एम.आय.डी.सी चे पोलीस निरीक्षक, अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून मदत कार्य सुरू आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असून त्यांना बुलढाणा येथे हलवण्यात आले आहे.

Exit mobile version