अयोध्येहून निघालेल्या साबरमती एक्स्प्रेसच्या दोन बोगींना आग लागून घडलेल्या घटनेचे सत्य उघड करणारा विक्रांत मॅसी याचा ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट १५ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने आपली छाप पाडत चांगली कमाई देखील केली. सत्य घटनेवर आधारित असणाऱ्या या सिनेमाचे सर्वच स्तरावरून कौतुक केले जात असून अनेक राजकीय नेत्यांनीही या चित्रपटासाठी गौरवोद्गार काढले आहेत. दरम्यान, गोध्रामध्ये जाळण्यात आलेल्या साबरमती एक्स्प्रेसचे सत्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे यासाठी भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी या सिनेमाचा विशेष शो आयोजित केला आहे.
शनिवार, ३० नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता ग्रोव्हेल्स मॉल (कांदिवली) येथे ‘द साबरमती रिपोर्ट’ या सिनेमाचा विशेष शो ठेवण्यात आला आहे. हा शो सर्वांसाठी खुला असून जास्तीत जास्त लोकांनी हा सिनेमा पाहावा असं आवाहन अतुल भातखळकर यांनी केले आहे.
अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, “पुरोगाम्यांचे एक वैशिष्ट्य असते ते कायम अर्धसत्य सांगून जनतेला बेवकूफ बनवण्याचा प्रयत्न करतात. गुजरात दंगलींवरून ठणाणा करणाऱ्यांनी गोध्रामध्ये जाळण्यात आलेल्या साबरमती एक्स्प्रेसचे सत्य लोकांपासून लपवले. ‘द साबरमती रिपोर्ट’ या सिनेमात तेच जळजळीत सत्य मांडण्याचा प्रयत्न झाला आहे. अत्यंत प्रभावी असलेल्या या सिनेमाच्या शोचे आज दुपारी १ वाजता ग्रोवेल्स Mall मध्ये आयोजन करण्यात आले आहे. शो सर्वांसाठी खुला आहे. चुकवू नका…”
पुरोगाम्यांचे एक वैशिष्ट्य असते ते कायम अर्धसत्य सांगून जनतेला बेवकूफ बनवण्याचा प्रयत्न करतात. गुजरात दंगलींवरून ठणाणा करणाऱ्यांनी गोध्रामध्ये जाळण्यात आलेल्या साबरमती एक्स्प्रेसचे सत्य लोकांपासून लपवले.
‘साबरमती रिपोर्ट’ या सिनेमात तेच जळजळीत सत्य मांडण्याचा प्रयत्न झाला आहे.… pic.twitter.com/wUXNlYgZYm— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 30, 2024
हे हि वाचा:
निवडणूक आयोगावर आक्षेपार्ह भाषेत टीका करणाऱ्या भाई जगतापांविरोधात तक्रार दाखल
बांगलादेशच्या चितगावमध्ये तीन हिंदू मंदिरे लक्ष्य!
‘फेंगल’ चक्रीवादळ तामिळनाडू, पुद्दुचेरीच्या किनारी भागात धडकणार!
चॅम्पियन्स ट्रॉफीवर तोडगा काढण्यासाठी आयसीसीची बैठक आज!
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘द साबरमती रिपोर्ट’चे कौतुक केले होते. त्यांनी एक्सवर लिहिले होते की, “खोटी कथा मर्यादित काळासाठीच टिकते. शेवटी, तथ्ये नेहमीच समोर येतात.” यानंतर गृहमंत्री अमित शाह यांनीही या सिनेमाचे कौतुक केले होते. गृहमंत्री अमित शाह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर करत चित्रपटाचे कौतुक केले होते. सत्य कायमचे अंधारात राहत नाही, असे ते म्हणाले होते.