कांदिवलीतल्या ग्रोवेल मॉलमध्ये रविवारी ‘द केरला स्टोरी’चा होणार खास शो

भाजपाचे आमदार अतुल भातखळकर खास महिलांसाठी केले खास शोचेआयोजन

कांदिवलीतल्या ग्रोवेल मॉलमध्ये रविवारी  ‘द  केरला स्टोरी’चा होणार खास शो

सर्व वादात अडकलेला ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट अखेर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी बराच गदारोळ झाला होता आणि अनेक राजकीय पक्षांनी निषेध केला आणि चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली होती. पण अखेर सगळ्यावर मात करत हा चित्रपट प्रदर्शित झाला. लव्ह – जिहादचे वास्तव चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर घेऊन आलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर जवळपास ८ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाचा एका खास शोचे आयोजन भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी कांदिवलीमध्ये ७ मे रोजी आयोजित केला आहे.

द केरला स्टोरी’ ची कथा केरळमधील तीन महिलांवर आधारित आहे. सिनेमाचं कथानक नर्सिंग महाविद्यालयात शिकणाऱ्या शालिनी उन्नीकृष्णनवर आधारित आहे. महिलांचे धर्मांतर करून त्यांना इसिस या दहशतवादी संघटनेमध्ये सामील होण्यासाठी कशा प्रकारे ब्रेनवॉश केले जाते याचे सत्य समोर आणणारा हा चित्रपट आहे. ‘द केरला स्टोरी’ चे दिग्दर्शन सुदिप्तो सेन यांनी केले आह. अदा शर्माने चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील अदा शर्माच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे.

आधी काश्मीर फाइल्सवरून असाच वाद  झाला होता. त्यानंतर आता द केरला स्टोरी चित्रपटाचा ट्रेलर रीलिज झाल्यापासून हा चित्रपट वादात सापडला होता. एका विशिष्ट समुदायाने या चित्रपटावर आक्षेप घेतला होता. जमियत उलेमा-ए-हिंदनेही चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला. सध्या हा चित्रपट सर्व वादांच्या दरम्यान चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

हे ही वाचा:

यूपी संस्कृत बोर्डाच्या परीक्षेत १४,००० मुलांना मागे टाकत मुस्लिम विद्यार्थी अव्वल !

‘द केरळ स्टोरी’ पहिल्याच दिवशी सुपरहिट!

सुरक्षा दलाला यश, बारामुल्लामध्ये दहशतवाद्याचा खात्मा

इतिहासात पहिल्यांदाच ब्रिटनच्या राज्याभिषेक सोहळ्याला हिंदू धर्मगुरूंची उपस्थिती

लव्ह -जिहाद चित्रपटातलं वास्तव लोकांसमोर यावे, हा विषय लोकांपर्यंत विशेष करून महिलांपर्यंत पोहचावा. त्यांनी तो विषय सजवून घ्यावा, या उद्देशाने माझ्या कांदिवली मतदार संघातील महिलांसाठी या बहुचर्चित आणि सत्य घटनेवर आधारित सिनेमाचा विशेष शो रविवार ७ मे रोजी कांदिवलीतील ग्रोवेल मॉल येथे आयोजित करण्यात आला असल्याचे भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी सांगितले.

Exit mobile version