महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या उत्सवाची आजपासून सुरुवात झाली आहे. गणेशोत्सवानिमित्त राज्य सरकारकडून विशेष पुरस्करांची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाला पाच लाखांचा पुरस्कार देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आता २ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत.
राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मिळणार पुरस्कार. २ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ. सांस्कृतिक कार्य मंत्री @SMungantiwar यांची माहिती. प्रथम क्रमांकास ५ लाख, द्वितीय क्रमांकास २ लाख ५० हजार तर तृतीय क्रमांकास १ लाखाचे पारितोषिक व प्रमाणपत्र देणार. pic.twitter.com/FOfI13L28t
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 31, 2022
गणेशोत्सवानिमित्त होणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाकडून करण्यात आले आहे. या स्पर्धेची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटवकावणाऱ्या मंडळाला पाच लाख रुपये तर द्वितीय क्रमांकासाठी २ लाख ५० हजार आणि तृतीय क्रमांकासाठी एक लाख रुपये आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यासोबतच जिल्हात प्रथम येणाऱ्या मंडळांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचं बक्षीस मिळणार आहे. यापूर्वी स्पर्धेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑगस्ट होती मात्र ती वाढवून आता २ सप्टेंबरपर्यंत करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
जेष्ठ नागरिकांचा ‘त्या’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटणार
बीसीसीआय म्हणजे ‘क्रिकेट की दुकान’
लालबागच्या राजाच्या दरबारी भाविक, सुरक्षा रक्षकांमध्ये वादावादी
या स्पर्धेचे नियम पुढील प्रमाणे आहेत:
- स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मंडळांना धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करणं आवश्यक असणार आहे.
- स्थानिक पोलीस ठाणे किंवा स्थानिक स्वराज संस्थेची परवानगी मंडळांना असणं आवश्यक असणार आहे.
- स्पर्धेत सहभागासाठी www.pldeshpandekalaacademy.org या वेबसाईटवर What is news या सेक्शनमध्ये अर्ज उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
- पुढे हा अर्ज mahotsav.plda@gmail.com या ई-मेलवर २ सप्टेंबर २०२२ पर्यंत पाठवता येणार आहेत.
तसेच मंडळांची निवड जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय समितीमार्फत करण्यात येणार आहे.