33 C
Mumbai
Tuesday, November 5, 2024
घरविशेषनवरात्र २०२२ : महाराष्ट्रातील महिलांना मुख्यमंत्र्यांची विशेष भेट

नवरात्र २०२२ : महाराष्ट्रातील महिलांना मुख्यमंत्र्यांची विशेष भेट

राज्य सरकारकडून नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने महिलांसाठी खास अभियान राबवले जाणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी या अभियानाची घोषणा केली आहे.

Google News Follow

Related

आजपासून राज्यासह देशभरात शारदीय नवरात्री उत्सवाला साजरा केला जात आहे. तसेच राज्य सरकारकडून या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने महिलांसाठी खास अभियान राबवले जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात घोषणा केली असून, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने राज्याच्या आरोग्य विभागामार्फत ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ हे विशेष अभियान राबवण्यास सुरुवात होत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी ९ ते २ या वेळेत अठरा वर्षावरील महिला, माता यांच्या सर्वांगीण तपासण्या केल्या जाणार आहेत. रक्त तपासण्या, जननी सुरक्षा योजना प्रधानमंत्री मातृ वंदना योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांचं नवीन बँक खातं उघडणं, गरोदर मातांचं आधारकार्ड जोडणं यांचा समावेश असल्याची माहितीही आरोग्य विभागाने दिली आहे.

२६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर दरम्यान चालणाऱ्या या अभियानात घरातील माता निरोगी राहावी, जागरूकता राहावी सोबतच समाजात तिच्या आरोग्याबद्दल संवेदनशीलता निर्माण व्हावी, हा मुख्य उद्देश या अभियानाचा असणार आहे. यानिमित्ताने राज्यातील सर्व माता,भगिनींनी आपल्या आरोग्याची आवश्य तपासणी करून घ्यावी अशी विनंती, मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

या अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर नवरात्र कालावधीत रोज महिलांची तपासणी होणार आहे. वैद्यकीय अधिकारी स्वतः या महिलांची तपासणी करणार आहेत. यासोबतच ग्रामीण रूग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकारी आणि स्त्रीरोग तज्ज्ञ तपासणी करणार आहेत. आजारी महिलांना उपचार आणि आवश्यकतेनुसार जिल्हास्तरावर उपचारासाठी पाठवण्यात येणार आहेत. तसेच उपकेंद्र किंवा आरोग्य वर्धिनी केंद्रावर समुदाय आरोग्य अधिकारी यांनी तपासणी करावयाची असून यासाठी अंगणवाडी किंवा ग्रामपंचायतीमध्ये तपासणी शिबीरे घेण्यात येणार आहेत.

हे ही वाचा:

भारतात चाइल्ड पोर्नोग्राफीविरोधात ‘ऑपरेशन मेघदूत’

बारावीनंतर विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना करता येणार नोकरी

नवरात्र २०२२: महाराष्ट्राचं शक्तीस्थळ तुळजापूर

नवरात्रीसाठी बाजार फुलले, धारावीच्या कुंभारवाड्यात लगबग सुरू

भरारी पथकाच्या माध्यमातून या अभियानावर लक्ष ठेवलं जाणार आहे. नवविवाहित महिलांवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य पथकं देखील शाळांमध्ये आरोग्य तपासणी करणार आहेत. सोनोग्राफी शिबिरे आणि कुटुंबकल्याण शस्त्रक्रियांबाबतही या दरम्यान माहिती देण्यात येणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
187,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा