पंतप्रधान नरेंद्र मोदी आज(१२ मे) निवडणूक प्रचारासाठी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असून हुगळीत त्यांनी एका जाहीर सभेला संबोधित केले. या जाहीर सभेदरम्यान एक भावनिक क्षण आला, खरं तर जेव्हा पंतप्रधान मोदी जाहीर सभेला संबोधित करत होते, त्याचवेळी लोकांच्या गर्दीतून दोन तरुणांनी स्वतःच्या हाताने रेखाटलेले पंतप्रधान मोदींच्या आईचे चित्र दाखवले.पंतप्रधान मोदींची नजर या फोटोंवर पडताच अचानक त्यांच्या चेहऱ्यावर भावनिक हसू उमटले आणि ते भावुक झाले.
पंतप्रधान मोदींनी त्वरित आपल्या एसपीजी जवानांना आदेश देऊन दोन्ही फोटो स्वतः जवळ आणण्यास सांगितले.’मातृ दिनाच्या’ निमित्ताने ही भेट घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी भावूक झाले.यावेळी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘पाश्चिमात्य देशांमध्ये लोक हा दिवस ‘मदर्स डे’ म्हणून साजरा करतात, परंतु भारतात आपण वर्षातील प्रत्येक दिवशी माँ दुर्गा, माँ काली आणि भारत मातेची पूजा करतो.माझ्या आईचे ज्यांनी चित्र काढले आहे. मी एसपीजी कमांडोंना फोटो गोळा करण्याचे आवाहन करतो.दोन्ही तरुणांनी फोटोच्या पाठीमागे स्वतःचा पत्ता लिहावा कारण मला तुमचे आभार मानायचे आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
हे ही वाचा:
संभाजीनगरात मोबाईलच्या दुकानात सापडले ३९ लाख, नोटा मोजण्याचे मशीन!
बद्रीनाथ धामचे दरवाजे भाविकांसाठी उघडले
‘राफा रिकामे करा, नाहीतर घुसतो!’
बंगाल म्हणजे बॉम्बचे घर? भाजपा नेत्याच्या घरातच बॉम्ब पेरले
पंतप्रधान मोदींना भेटवस्तू म्हणून मिळालेल्या एका फोटोमध्ये पंतप्रधान मोदी त्यांच्या आईच्या पायाजवळ बसलेले दिसत आहेत आणि त्यांची आई त्यांना काही गोष्टी सांगताना दिसत आहे. दुसऱ्या छायाचित्रात, पंतप्रधान मोदींच्या आई त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांची काळजी घेताना दिसत आहेत.जगभरात दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन साजरा केला जातो. यंदा मदर्स डे आज म्हणजेच १२ मे रोजी साजरा केला जात आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदी एका मुलाखतीत आपल्या आईची आठवण काढून भावुक झाले होते.पंतप्रधान मोदींच्या आई हिराबेन यांचे गेल्या वर्षी निधन झाले होते.मुलाखतीत पंतप्रधान मोदी म्हणाले की, ही पहिली लोकसभा निवडणूक आहे, ज्यामध्ये आईच्या पायाला स्पर्श न करता मी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाणार आहे.पंतप्रधान मोदी १४ मे रोजी वाराणसीतून उमेदवारी अर्ज भरणार आहेत.