25 C
Mumbai
Monday, January 6, 2025
घरविशेषभारतीय लष्कराने चीनला दाखवली चिलखती ताकद !

भारतीय लष्कराने चीनला दाखवली चिलखती ताकद !

पूर्व लडाखमध्ये मोठ्या प्रमाणात रणगाडे आणि चिलखती लढाऊ वाहनाच्या आवाजाने चीनला भरली धडकी

Google News Follow

Related

पूर्व लडाख सेक्टरमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये अनेकदा चकमकी होत असतात. चीन वारंवार भारताला डिवचण्याचा प्रयत्न करत असतो. तसेच कृत्य चीनने केले. चिनी सैन्याने पूर्व लडाख सेक्टरमध्ये सैन्य मागे घेऊन रणगाड्यांसह आक्रमकता दाखवण्यास सुरुवात केली तेव्हा भारताने देखील मागे ने हटता भारतीय लष्कराने पूर्व लडाखमध्ये मोठ्या प्रमाणात रणगाडे आणि चिलखती लढाऊ वाहने तैनात करून आपली ताकद दाखवली. पाकिस्तानात प्रवेश करण्यापूर्वी सिंधू नदी संपूर्ण लडाख सेक्टर मधून चीनी सैन्यांच्या नियंत्रणाखालील तिबेट क्षेत्रातून वाहते.

सिंधू नदी ओलांडण्यासाठी आणि पूर्व लडाखमधील शत्रूच्या स्थानावर हल्ला करण्यासाठी सैन्याने जगातील सर्वात उंच नदी खोऱ्यांपैकी एकामध्ये मोठ्या संख्येने टाक्या आणि चिलखती वाहने तैनात केली. भारतीय सैन्याने T-९० आणि T-७२ टॅंक आणि बीएमपी पायदळ लढाऊ वाहनांचा समावेश असलेले एक टॅंक फॉर्मेशन तयार करत लष्कराने शक्तिप्रदर्शन करत सराव केला. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की,अशा प्रकारचे सराव आपत्कालीन परिस्थितीच्या तयारीसाठी केले जातात. त्याचवेळी दऱ्यांच्या मार्गाने भारतीय भूभाग काबीज करण्याचा शत्रूचा प्रयत्न पाडण्यासाठी लष्कर सज्ज आहे.

हे ही वाचा:

बांग्लादेशी मुलीशी लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारणाऱ्याची ‘घरवापसी’

प्रदीप कुरुलकर त्या पाक एजंटकडे आकर्षित झाले आणि खूप काही सांगून बसले!

कर्नाटक विधानसभेत बजेट सत्र सुरू असतानाच एक माणूस घुसला

‘आदिपुरुष’ प्रकरणी मनोज मुंतशीरकडून जाहीर माफी!

ते पुढे म्हणाले, भारतीय सैन्य हे जगातील काही सैन्यांपैकी एक आहे जे १६ हजार फूट उंचीवर मोठ्या संख्येने रणगाडे चालवते. युवा चिनी सैन्याने पूर्व लडाख सेक्टरमध्ये सैन्यमागे घेऊन रणगाड्यांचा आक्रमक दाखवण्यास सुरुवात केली तेव्हा भारतीय लष्कराने पूर्व लडाख सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात रणगाडे आणि चिलखती व लढाऊ वाहणे तैनात केली. भूप्रदेशात मोकळ्या खोऱ्या आहेत ज्या टाकीच्या लढाईसाठी अतिशय अनुकूल आहेत.तसेच भारतीय लष्कर पाकिस्तानच्या सीमेवर म्हणजेच पंजाब सेक्टरमध्ये अशा प्रकारचे सराव मोठ्या प्रमाणावर करते, पुढे म्हणाले.

पूर्वी असे मानले जात होते की, रणगाड्याच्या लढाया फक्त मैदानी वाळवंटी भागात होतील परंतु अलीकडच्या काळात ही मानसिकता बदलली आहे. २०१३-१४ मध्ये पूर्व लडाखमध्ये प्रथमच रणगाड्यांचा समावेश करण्यात आला होता. २०२० मध्ये गलवान व्हॅलीमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर टाक्यांची संख्या अनेक पटीने वाढली. त्या घटनेनंतर भारतीय हवाई दलाच्या C-१७ आणि llyushin -७६ वाहतूक विमानांनी वाळवंट आणि मैदानी प्रदेशातून मोठ्या प्रमाणात टाके आणि बीएमपी आणले.भारताने केलेल्या सरावात चीनला नक्कीच धडकी भरली असेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा