शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या पक्ष वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. एका बाजूला शिवसेनेला खिंडार पडत असताना शेकडो शिवसैनिक उद्धव ठाकरेंना पाठींबा देण्यासाठी मातोश्रीवर येत आहे. अशातच एका शिवसैनिकाचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड पुकारल्यामुळे मोठे भगदाड पडले आहे. दरम्यान उद्धव ठाकरेंचे समर्थक मातोश्रीवर येऊन शिवसैनिक पाठिंबा दर्शवत आहे. पण, शिवसैनिकांच्या या गर्दीमध्ये एका शिवसैनिकाचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. भगवान काळे असं या शिवसैनिकाचं नाव आहे. भगवान काळे हे शहापूर तालुक्यातील रहिवासी होते.
हे ही वाचा:
पवईतील हिरानंदानी मॉलमध्ये भीषण आग
महाराष्ट्रासारखा राजकीय भूकंप इंग्लंडमध्ये, जॉन्सन सरकारमधील ३९ मंत्र्यांचा राजीनामा
शिवसेनेला खिंडार; ठाण्याचे ६६ माजी नगरसेवक मुख्यमंत्री शिंदेंच्या बाजूने
नवलानी प्रकरणी संजय राऊतांना दणका; किरीट सोमय्यांना दिलासा
मागील काही दिवसांपासून मातोश्री आणि शिवसेनाभवनावर बैठका पार पडत आहे. भगवान काळे हे काही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी आले होते. मातोश्रीवर बैठक सुरू असताना अचानक काळे यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर काळे यांना तातडीने कलानगर येथील रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र, वाटेतच त्यांचा ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. शहापूर तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना काळे यांच्या निधनामुळे मोठा धक्का बसला आहे.