युक्रेनच्या सीमेजवळ रशियन विमान कोसळले, ६५ जणांचा मृत्यू!

युक्रेनियन युद्धकैद्यांना घेऊन जात असताना झाला अपघात

युक्रेनच्या सीमेजवळ रशियन विमान कोसळले, ६५ जणांचा मृत्यू!

युक्रेनच्या सीमेजवळ रशियन विमान कोसळून ६५ जणांचा मृत्यू झाला आहे.रशियन इल्युशिन Il-७६ या लष्करी वाहतूक विमानाचा अपघात झाला.हे विमान युक्रेनियन युद्धकैद्यांना घेऊन बेलग्रूड येथे युक्रेन लष्कराकडे सोपवण्यासाठी घेऊन जात असताना हा अपघात झाला.

आरआयएने संरक्षण मंत्रालयाचा हवाला देऊन सांगितले की, क्रॅश झालेल्या विमानात ६५ युक्रेनियन युद्धकैदी होते.या युक्रेनियन युद्धकैद्यांना बेलग्रूड येथे नेण्यात येत होते.तसेच विमानात सहा क्रू सदस्य आणि इतर तीन एस्कॉर्टस देखील होते.हे रशियन विमान युक्रेनच्या सीमेजवळ कोसळले, ज्यामध्ये ६५ युद्धकैद्यांसह सर्वांचा विमानातील अन्य लोकांचा मृत्यू झाला आहे.मात्र, विमान कशामुळे कोसळले याची माहिती अद्यापही मिळालेली नाही.

हे ही वाचा:

DGCA ने एअर इंडियाला ठोठावला १.१० कोटींचा दंड!

ममता दीदीनंतर पंजाबचा सूर बदलला, पंजाबमधून आप- १३ जागांवर एकटाच लढणार!

सूर्या ठरला ‘टी- २० प्लेअर ऑफ दि इअर’

राहुल गांधींना सुरक्षा द्या, खर्गेंचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र!

या विमान अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.याबलोनोवो गावाजवळ हे विमान खाली येते आणि त्यानंतर विमान जमिनीवर कोसळते आणि एकच मोठा स्फोट होऊन आगीच्या ज्वाला बाहेर निघताना व्हिडिओमध्ये दिसत आहे.दरम्यान,अपघात झालेले रशियन इल्युशिन Il-७६ हे लष्करी वाहतूक विमान आहे.या विमानाचा वापर सैन्य, मालवाहू, लष्करी उपकरणे आणि शस्त्रास्त्रे वाहून नेण्यासाठी केला जातो.

Exit mobile version