पश्चिम रेल्वेने फुकट्या प्रवाशांविरोधात शनिवारी मोहीम उघडली होती. त्यावेळी दादर स्थानकात एकाच दिवशी तब्बल १६४७ फुकट्या प्रवाशांना पकडण्यात आले. एका दिवसात इतक्या मोठ्या संख्येने फुकट्या प्रवाशांना पकडण्याची भारतील रेल्वेच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ होती.
जास्तीत जास्त फुकट्या प्रवाशांना पकडण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या टीसींनी दादर स्थानकातील प्रवेशद्वारे आणि बाहेर पडण्याच्या मार्गांवर कडेकोट पाळत ठेवली होती. पश्चिम रेल्वेने फुकट्या प्रवाशांना पकडण्यासाठी ‘मेरा तिकिट, मेरा इमान’ ही मोहीम राबवली आहे. या मोहिमेंतर्गत रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक नीरज वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली दादर स्थानकात शनिवारी मोहीम राबवण्यात आली. ‘जणू काही त्सुनामी आल्यासारखे १९५ तिकीट तपासनीस कर्मचारी ३० सप्टेंबर रोजी सकाळपासूनच दादर स्थानकात तैनात होते.
हे ही वाचा:
स्केटिंग रिलेमध्ये भारताची दोन कांस्य पदकांची कमाई
ते जर्मनीच्या अध्यक्षांचे निवासस्थान, बोर्डिंग स्कूल नव्हे!
तजिंदरपालसिंगने केली सुवर्णविजेती गोळाफेक!
ही मोहीम संपूर्ण दिवस चालली,’ अशी माहिती एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने दिली. ‘अशा प्रकारे तिकीट तपासनीस दादर स्थानकात असल्याने फुकट्या प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. एम-इंडिकेटर ऍपमध्येही फुकट्या प्रवाशांना सतर्क करण्याचे संदेश दिले जात होते. दादर स्थानकावर नक्की तिकीट घ्या, नाहीतर मोठे संकट तुमची वाट पाहात आहे, असे संदेश दिले जात होते,’ असे रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
दिवस संपला तेव्हा सुमारे एक हजार ६४७ रेल्वे प्रवाशांना पकडण्यात आले होते. त्यांच्याकडून तब्बल चार लाख २२ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकात एरवी दररोज सरासरी २३० फुकट्या प्रवाशांना पकडले जाते. तर, पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय विभागात चर्चगेट ते डहाणू स्थानकांदरम्यान दररोज एकूण सरासरी ७६२ फुकटे प्रवाशांना पकडले जाते. दादर स्थानकात शनिवारी पकडण्यात आलेल्या फुकट्यांची संख्या एरवीपेक्षा जवळपास दुप्पट होती.