अनेक वर्षांपासून साठवून ठेवलेल्या मद्यासाठी मद्यप्रेमी लाखो रुपये द्यायला तयार असतात. अशाच एका प्रकरणात मॅकलन व्हिस्कीच्या बॉटलसाठी बोली लावण्यात आली होती. ही व्हिस्की बॉटल एका व्यक्तीने तब्बल २.७ मिलियन डॉलरला (जवळपास २२ कोटी रुपये) विकत घेतली. १९२६ सालची ही मॅकलन व्हिस्की बॉटल होती.
लंडनच्या सोथबी येथे पार पडलेल्या कार्यक्रमात विक्रमी बोली लावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दुर्मिळ मद्य खरेदीसाठी आतापर्यंत लावण्यात आलेल्या बोलीमध्ये लंडन येथे लावण्यात आलेली बोली सर्वाधिक असल्याचा दावा या क्षेत्रातील तज्ञांनी केला आहे. १९२६ सालची सिंगल माल्ट मॅकलन व्हिस्कीवर वलेरिओ अदामीचे लेबल आहे. दुर्मिळातील दुर्मिळ म्हणून या व्हिस्की बॉटलकडे पाहिले जात आहे. या मद्याची निर्मिती १९२६ मध्ये करण्यात आली होती, त्यानंतर ६० वर्षे बॅरेलमध्ये ठेवल्यानंतर १९८६ साली बॉटलमध्ये बंद करण्यात आले होते.
सोथबीचे प्रमुख जॉनी फॉवले हे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “मॅकलन व्हिस्की १९२६ ही सर्व बोली लावणाऱ्यांना आणि कलेक्शन करु पाहणाऱ्या सर्वांसाठी पसंदीची आहे. चार वर्षांआधी विक्रम प्रस्थापित झाल्यानंतर पुन्हा एकदा बोलीसाठी ही व्हिस्की आणण्यासाठी मी खूप उत्सूक होतो. इतिहास घडल्याने मी खूप आनंदी आहे.”
हे ही वाचा:
‘भारताचे फलंदाज चांगले खेळले नाहीत; खेळपट्टीला दोष देणार नाही’
पुण्यात कोयता गँगची दहशत; पाठलाग करत इमारतीच्या छतावर तरुणाची हत्या
भारत पराभूत झाला, पण ऑस्ट्रेलिया का जिंकली?
ओलिसांच्या सुटकेच्या बदल्यात युद्धविराम नाही
मॅकलन व्हिस्कीच्या बॉटलसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात बोली लावण्यात आल्याची ही पहिलीच वेळ नसून याआधी २०१९ मध्ये मॅकलन व्हिस्कीची बॉटल १.८६ मिलियन डॉलर किंमतीला विकण्यात आली होती. त्यावेळसही किंमतीबाबतचा विक्रम मोडला गेला होता.