पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात ९ वर्षे जम्मू आणि काश्मीरमध्ये अनेक बदल झाले आहेत. काश्मीरमध्ये होणारे सकारात्मक बदल दिसू लागले आहेत. हेच सकारात्मक बद्दल मांडत दोन रॅपर्सनी एक रॅप साँग म्हटलं आहे. या गाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
व्हायरल होणाऱ्या या गाण्यात नव्या, बदललेल्या काश्मीर या संकल्पनेवर जोर देण्यात आला आहे. काश्मीरमध्ये होणारा विकास, सुधारणारं पर्यटन शिवाय संपत चाललेली दहशत यावर अधिक भाष्य करण्यात आले आहे. भारताच्या प्रगती आणि विकासासह जी- २० परिषदेचाही या रॅप साँगमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. महिला सक्षमीकरण, डिजिटलायजेशन अशा अनेक मुद्द्यांना हात घालण्यात आला आहे.
हे ही वाचा:
महाराजा यशवंतराव होळकर यांचे मुंबईत स्मारक उभारणार
राष्ट्रीय स्मारकासाठी पुण्यातील भिडेवाडा इतिहासजमा
२६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड साजिद मीरवर तुरुंगात विषप्रयोग
राज्यात ७५ ठिकाणी नाट्यगृह उभारणीसाठी ३८६ कोटींचा निधी देणार
याशिवाय अनेक दिग्गजांनी हे रॅप साँग सोशल मीडियावर शेअर केलं आहे. माजी क्रिकेटपटू सुरेश रैना यानेही त्याच्या एक्सवर (ट्वीटर) हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हे दोन कलाकार प्रो लेव्हलचे असल्याचे त्याने म्हटलं आहे. माजी क्रिकेटर दानिश कनेरिया यांनीही हा व्हिडीओ पोस्ट करत या रॅपला एक अद्भुत रॅप असं म्हटलं आहे. याशिवाय सोशल मीडिया वापरकर्त्यांनीही यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.