31 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरविशेषयावर्षी प्रदूषणमुक्त दिवाळीची शपथ

यावर्षी प्रदूषणमुक्त दिवाळीची शपथ

यावेळी प्रदूषणमुक्त दीपावलीची शपथ देण्यात आली आहे.

Google News Follow

Related

शिंदे फडणवीस सरकारच्या वतीने ‘प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प अभियान २०२२’ चे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाची सुरुवात आजपासून झाली आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्याचे शालेय शिक्षणमंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री हे उपस्थित होते. यावेळी प्रदूषणमुक्त दीपावलीची शपथ देण्यात आली आहे.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, निसर्गाचा समतोल राखण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवाहन केले आहे. मंत्रालयामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत आणि अंध विद्यार्थ्यांसमक्ष ही शपथ देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सर्वांनी पर्यावरणाचा समतोल राखण्याची गरज आहे. यामुळे प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. प्रदूषामुळे निसर्गाचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती होणं गरजेचं आहे. सरकारच्या वतीनेही यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच प्लास्टिकबाबती सरकार गंभीर विचार करत असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. राज्यात एकल वापर प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली असून, या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्यात येईल, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे असलेले निर्बंध संपून आता सर्व सण उत्साहात साजरे केले जात आहेत. दिवाळी सण देखील उत्साहात साजरा करताना पर्यावरणाचा समतोल राखणे गरजेचे आहे, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.

प्रदूषणमुक्त दिवाळी कार्यक्रम मंत्रालय परिसरात आयोजित करण्यात आले होते. मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दीपावलीची शपथ देण्यात आली. अंध मुलांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.

हे ही वाचा:

पाकवर वचक ठेवायला भारत- पाकिस्तान सीमेलगत नवा एअरबेस

पनवेल येथून पीएफआयच्या पदाधिकाऱ्यासह तिघांना अटक

भारताविरोधी वक्तव्य करणाऱ्या ब्रिटनच्या गृहमंत्र्यांचा राजीनामा

समीर वानखेडेंनी केलेल्या तक्रारीची राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडून दखल

विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घरोघरी संदेश पोहोचतो त्‍यामुळे दरवर्षी प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्तीची शपथ देण्याचा उपक्रम राबविण्यात येतो. त्याचप्रमाणे वर्षभर जनजागृती करण्यात येत असल्याची पर्यावरण विभागाचे सचिव प्रवीण दराडे यांनी सांगितले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा